CJP साठी आला, गुरुद्वारात राहिला, ठाकरेंच्या मोर्चात युपीता छोकरा का?

मुंबई तक

04 Oct 2026 (अपडेटेड: 04 Oct 2026, 12:08 PM)

मुंबईत आज ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरोधात गर्जना मोर्चा होत आहे. या मोर्चातील एक विशेष गोष्ट म्हणजे यासाठी थेट उत्तर प्रदेशातून एक वीस वर्षीय तरुण दाखल झाला आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.

Garjana Morcha Mumbai

Garjana Morcha Mumbai

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

CJP साठी युपीहून आला,

point

आता ठाकरेंच्या मोर्चातही सहभागी होणार 20 वर्षीय तरुण

point

संविधानाचा दाखला देत काय म्हणाला?

Garjana Morcha Mumbai : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि मतदार याद्यांमधील कथित घोळाविरोधात आज मुंबईत एका भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आयोजन केले आहे. या ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोक मुंबईत दाखल झाले असून, यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेला 12 वी उत्तीर्ण झालेला सर्वेश्वर हा २० वर्षांचा तरुण विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, सर्वसामान्य जनतेचा आणि संविधानाच्या रक्षणाचा लढा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

मतांचे मूल्य उरणार नसेल तर लोकशाही टिकेल का?

उत्तर प्रदेशातून केवळ या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या सर्वेश्वरने हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून थेट देशाच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा असल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला, "संविधान आपल्याला देशाचा पंतप्रधान आणि लोकप्रतिनिधी निवडण्याचा मूलभूत अधिकार देते. पण जर निवडणूक आयोगच पक्षपाती किंवा विकला गेला असेल, तर आपण काय करणार? मी कोणत्याही पक्षासाठी नव्हे, तर देशातील संविधानाच्या रक्षणासाठी इथे आलो आहे." पुढे बोलताना त्याने सांगितले की, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत तो स्वतः मतदान करणार असून, जर मतांचे मूल्यच उरणार नसेल तर लोकशाही कशी टिकणार, असा सवाल त्याने उपस्थित केला.

हे ही वाचा : ठाकरेंचा 'गर्जना मोर्चा' सुरू होण्याआधीच सगळ्यात मोठी आणि इंटरेस्टिंग बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच नाही घडलं!

स्वत:च्या पैशांनी आला, गुरुद्वारात राहिला

मुंबईत राहण्यासाठी किंवा प्रवासासाठी कोणताही राजकीय पाठिंबा अथवा नातेवाईक नसतानाही सर्वेश्वरने या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याने सांगितले की, शिक्षण घेताना केलेल्या कामातून साठवलेल्या स्वतःच्या पैशांनी तो मुंबईत आला असून, राहण्यासाठी त्याने गुरुद्वाराचा आसरा घेतला. राज ठाकरे यांनी भूतकाळात उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांविरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता, तो म्हणाला की पक्षाचे राजकारण वेगळे आहे; पण सध्याचा मुद्दा संपूर्ण देशाचा आणि संविधानाचा आहे. जिथे जिथे संविधानाची आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेची बात होईल, तिथे तिथे तो आंदोलनासाठी पोहोचेल.

हे ही वाचा : 'आम्ही ग्यानेश कुमारांना सवाल विचारतोय, भाजप का उत्तर देतोय?', शिवसेना नेत्याचा BJP ला बोचरा सवाल

जिथे-जिथे आंदोलन, तिथे-तिथे जाणार

या मोर्चादरम्यान कोणतीही राजकीय चिन्हे किंवा पक्षांचे झेंडे नसून, हातात तिरंगा आणि संविधानाची प्रत घेऊन नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. सर्वेश्वरसारख्या तरुण आंदोलकांचे म्हणणे आहे की, निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडाल्यास देशाच्या स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला धोका निर्माण होईल. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, हीच या ‘गर्जना’ मोर्चाची मुख्य मागणी आहे. जिथे जिथे हा मुद्दा उपस्थित केला जाईल, तिथे संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार या तरुणाने व्यक्त केला आहे.