पैठणच्या सभेत पैसे देऊन गर्दी केली?; एकनाथ शिंदेंचा नाथांच्या नगरीतून उद्धव ठाकरेंवर पलट’वार’

मुंबई तक

• 12:53 PM • 12 Sep 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. एकनाथ शिंदे यांच्या या सभेपूर्वी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपचा आधार घेऊन विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधला. पैसे देऊन सभेसाठी गर्दी जमवली, असल्याचं म्हटलं गेलं. विरोधकांच्या आरोपाला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. पैठण येथे […]

Kalwa Hospital : uddhav Thackeray shiv sena slams to eknath shinde.

Kalwa Hospital : uddhav Thackeray shiv sena slams to eknath shinde.

follow google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. एकनाथ शिंदे यांच्या या सभेपूर्वी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपचा आधार घेऊन विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधला. पैसे देऊन सभेसाठी गर्दी जमवली, असल्याचं म्हटलं गेलं. विरोधकांच्या आरोपाला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं.

हे वाचलं का?

पैठण येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी गणपती दर्शनावरून केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

“मी एकदा शब्द दिला की पाळतो. जेव्हा अन्याय झाला. मुस्कटदाबी झाली. त्यावेळी भुमरे माझ्याकडे आले आणि म्हणाले, काय करायचं? मी त्यांना म्हणालो की, जे चाललंय ते चालू द्या. मला काही प्रॉब्लेम नाही. भुमरेंनी शब्द दिला आणि पाळला. सगळ्यांनी कार्यक्रम करायचं ठरवलं होतं, पण ५० लोक पुरून उरले”, असं शिंदेंनी उत्तर दिलं.

    follow whatsapp