एकनाथ शिंदेंची भाजपसोबत मैत्री अनेक दिवसांची; खडसेंचा गौप्यस्फोट, गुलाबराव पाटलांवरही टिकास्त्र

मुंबई तक

• 10:08 AM • 30 Jun 2022

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद आमदार एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार निशाणा साधला आहे. एकेकाळी भाजपची धगधगती तोफ मानले जाणारे खडसे भाजपमधून बाहेर पडले, तेव्हापासून ते भाजप नेतृत्वावर टिका करत आहेत. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर प्रथमच एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे […]

Mumbaitak
follow google news

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद आमदार एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार निशाणा साधला आहे. एकेकाळी भाजपची धगधगती तोफ मानले जाणारे खडसे भाजपमधून बाहेर पडले, तेव्हापासून ते भाजप नेतृत्वावर टिका करत आहेत. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर प्रथमच एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे आणि त्यांचा आमदारांचा गट यांची युती ही मागच्या अनेक दिवसांपुर्वीची आहे. एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत केव्हाच भाजपवरती टिका केली नाही. सत्ताधारी पक्षात असताना त्यांनी वेळोवेळी भाजप आमदारांची कामं केली. भाजप सोबत जाण्याचा त्यांचा निर्णय एका दिवसाचा नसून मागील अनेक महिन्यांपासून सुरु होते असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील १२ जणांना मिळू शकते संधी; कसं असेल नवं मंत्रिमंडळ?

एकनाथ खडसे यांनी यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावरही टिका केली आहे. ”फक्त एकनाथ शिंदे नाहीतर जळगावचे नेते गुलाबराव पाटील यांची भाजपसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही”. जसे महाविकास आघाडी सरकार स्थापन तसे गिरिष महाजन यांनी शिवसेनेवरती टोकाची भूमिका घेतली आहे, खालच्या पातळीवरती टिका केली आहे, परंतु गुलाबराव पाटील यांनी कधीच त्याला प्रत्युत्तर दिले नाही. यावरुन असे दिसते की यांची मैत्री जुनी आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

    follow whatsapp