माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ, बॉम्बे हायकोर्टाकडून दिलासा नाही

मुंबई तक

• 10:14 AM • 12 Nov 2021

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही. शुक्रवारी त्यांची ईडी कोठडी संपत असतानाच यामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. आता यानंतर अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत सोमवारपर्यंत म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. याआधी ईडीने मागितलेली कोठडी सत्र न्यायालयाने फेटाळत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा […]

Mumbaitak
follow google news

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही. शुक्रवारी त्यांची ईडी कोठडी संपत असतानाच यामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. आता यानंतर अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत सोमवारपर्यंत म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. याआधी ईडीने मागितलेली कोठडी सत्र न्यायालयाने फेटाळत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा निर्णय फेटाळून लावत त्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आता त्यामध्ये तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर शनिवारी (6 नोव्हेंबर 2021) पुन्हा कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्यांच्या कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून समोर आलेले नव्हते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.

अनिल देशमुखांचा मुलगाही ईडीच्या रडारवर

यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशमुख यांच्या वकिलाने हृषिकेश देशमुख याच्या वतीनेही अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला ज्यावर कोर्टात 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुनावणी होणार आहे.

काय प्रकरण आहे?

25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेचे नाव समोर आले होते. यानंतर याप्रकरणी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची महाराष्ट्र सरकारने आयुक्त पदावरुन हटवलं होतं. यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खळबजनक पत्र लिहिलं होतं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे याच्याकडे दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा दावा परमबीर सिंग यांनी या पत्रात केला होता.

    follow whatsapp