आकाशातून पडला सोनेरी दगड, उस्मानाबादमधली घटना, शेतकरी चिंतेत

गणेश जाधव उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे आकाशातुन पडला दगड पडल्याची खळबळजनक घटना घडली असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हा उल्कापात आहे की इतर वस्तू यांची चर्चा होत असून हा दगड महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे व भूजल सर्वेक्षण विभाग यांच्याकडे तपासणीसाठी पाठविला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावाजवळ प्रभू माळी यांच्या शेतात बांधाच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:28 PM • 25 Sep 2021

follow google news

गणेश जाधव उस्मानाबाद

हे वाचलं का?

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे आकाशातुन पडला दगड पडल्याची खळबळजनक घटना घडली असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हा उल्कापात आहे की इतर वस्तू यांची चर्चा होत असून हा दगड महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे व भूजल सर्वेक्षण विभाग यांच्याकडे तपासणीसाठी पाठविला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावाजवळ प्रभू माळी यांच्या शेतात बांधाच्या गवतावर आकाशातून एक दगड पडला, दगड अर्धवट जळालेल्या स्वरूपात असल्याने भीतीचे वातावरण आहे. माळी हे काम करत असताना जोराचा आवाज झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.उल्का की इतर काही हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या पडलेल्या दगडाचे 2 किलो ३८ ग्रॅम वजन असून सोनेरी रंगाचा दगड प्रशासनाने ताब्यात घेतला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे आकाशातून पडलेल्या दगड बाबत घाबरण्याचे कारण नसून हा उल्कापात चा प्रकार नसल्याचे स्पष्टीकरण भूजल सर्वेक्षण विभागाचे ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिल्यानंतर दिले आहे.

अवकाशातील आकाशगंगेतील उल्कापातानंतर ग्रहांचे तुकडे त्यांच्या कक्षेतून सुटून ते पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर ते जळलेल्या अवस्थेत येतात. तर काहींची राख होते. अशा प्रकारचे अपवादात्मक दगड पृथ्वीतलापर्यंत येत असतात. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. हा दगडही याच प्रकारातील असावा. त्याची तपासणी करण्यासाठी नागपूरच्या भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठविण्यात येत असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

    follow whatsapp