नवा लेटरबॉम्ब: ‘विशेष अधिवेशन बोलवा,’ राज्यपालांचा ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई तक

• 08:15 AM • 21 Sep 2021

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. मुंबईतील साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी, काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. ज्याविषयी एक पत्र […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

मुंबईतील साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी, काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. ज्याविषयी एक पत्र राज्यापालांना देण्यात आलं होतं. याच पत्रात महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती. हेच पत्र राज्यापालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आहे. ज्यावर टिप्पणी करताना त्यांनी महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचा विचार होऊ शकतो. असं म्हटलं आहे.

पाहा राज्यापालांनी ठाकरे सकारला नेमका काय सल्ला दिलाय

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षा संदर्भात अधिवेशनात चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्याचा विचार होऊ शकतो (you may consider calling a special session to discuss this)अशी टिप्पणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फॉरवर्ड केलेल्या पत्रावर केली आहे.

साकीनाका इथं झालेल्या बलात्कार प्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी राज्यपालांना दिलेल्या पत्रात केली होती.

Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल BJP नेत्यासारखं RSS साठी काम करत आहेत: नितीन राऊत

हेच पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फॉरवर्ड केलं आणि त्यात विशेष अधिवेशन बोलविण्याचा विचार होऊ शकतं अशी टिप्पणी या पत्रावर केली आहे.

दरम्यान, विशेष अधिवेशन बोलवा असे निर्देश राज्यापालांनी दिले असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत राज्यपाल कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

विशेष अधिवेशन बोलवा अशा सूचना देणारं कुठलंही पत्र राज्यपालांनी लिहिलेलं नाही. असं राज्यपाल कार्यालयाकडून यावेळी सांगण्यात आलं आहे.

    follow whatsapp