हा महाराष्ट्र! इथे मराठीत बोललं पाहिजे! राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जाहीर कार्यक्रमात सुनावलं

मुंबई तक

• 08:49 AM • 26 Nov 2021

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या नियुक्तीपासूनच विविध कारणांमुळे आणि महाविकास आघाडीला केलेल्या विरोधामुळे चर्चेत आहेत. आता सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. यवतमाळमधल्या कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला. हा महाराष्ट्र आहे, इथे कार्यक्रमात सूत्रसंचालन झालं पाहिजे अशी भूमिका राज्यपालांनी घेतली. यवतमाळमधे जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीदिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या नियुक्तीपासूनच विविध कारणांमुळे आणि महाविकास आघाडीला केलेल्या विरोधामुळे चर्चेत आहेत. आता सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. यवतमाळमधल्या कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला. हा महाराष्ट्र आहे, इथे कार्यक्रमात सूत्रसंचालन झालं पाहिजे अशी भूमिका राज्यपालांनी घेतली. यवतमाळमधे जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीदिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले राज्यपाल?

जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इंग्रजीमध्ये करण्यात येणाऱ्या सूत्रसंचालनावरुन राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. ‘हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमामंध्ये मराठीतचं सूत्रसंचालन व्हायला पाहिजे, अशी आग्रही भूमिका राज्यापालांनी मांडली. मराठी भाषा ही मातृभषा आहे याचं भान राखलं पाहिजे, राज्यात सर्वत्र मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे’ असंही ते म्हणाले.

ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?

महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थांच्या उपक्रमांमध्ये निमंत्रण यायचं. त्यावेळी एका कार्यक्रमात सूत्रसंचालक इंग्रजीमध्ये बोलत होता. त्या व्यक्तीला हटकत तुला मराठी ठाऊक नाही का? असा सवाल केल्याचं राज्यपालांनी सांगितलं. त्यावेळीच त्याला हा महाराष्ट्र आहे, इथं मराठीमध्ये सूत्रसंचालन केलं पाहिजे, प्रमुख पाहुणा इतर राज्यातील असला किंवा परदेशातील असला आणि त्याला मराठी हिंदी समजत नसेल तर इंग्रजीचा वापर करण्यास हरकत नाही, असंही राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी ही भाषा संस्कृत आणि हिंदी प्रमाणेच गोड असल्याच सांगितलं. मराठी भाषा सरळ, साधी आहे. मराठीचं वाचन करु शकतो आणि समजू शकतो, असं देखील राज्यपाल म्हणाले.

    follow whatsapp