जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त वंशजांसह जिजाऊंच्या पुतळ्याचे पालकमंत्र्यांनी केले पूजन

मुंबई तक

• 11:22 AM • 12 Jan 2022

जका खान, सिंदखेडराजा: राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या 424 व्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून जन्मोत्सवाला सुरवात करण्यात आली. सकाळी चार वाजता बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि राजे लाखोजी जाधव यांचे वंशज यांनी माँसाहेब जिजाऊंचे पूजन केले. सोबतच यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा देखील संपन्न झाली. […]

Mumbaitak
follow google news

जका खान, सिंदखेडराजा: राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या 424 व्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून जन्मोत्सवाला सुरवात करण्यात आली. सकाळी चार वाजता बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि राजे लाखोजी जाधव यांचे वंशज यांनी माँसाहेब जिजाऊंचे पूजन केले. सोबतच यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा देखील संपन्न झाली.

हे वाचलं का?

यावेळी जिजाऊंच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता तर जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला सिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

तब्बल दहा हजार दिव्यांची आरास करत जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजे सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर रोषणाई करण्यात आली होती. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या दीपोत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला.

दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ह्यावर्षी कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्या आला. मराठा सेवा संघाने आवाहन केल्याप्रमाणे, यावर्षी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत आहे. जिजाऊ जयंतीसाठी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर संपूर्ण देशभरातील लाखो जिजाऊ अनुयायी त्यांना मानवंदना देण्यासाठी दाखल होत असतात.

शिवजयंती विशेष: समुद्र, आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराज!

या वर्षी वाढत्या कोरोनामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे जिजाऊ आणि शिवप्रेमींचा हिरमोड झाला आहे. अशा सर्व जिजाऊ प्रेमींनी आपल्या घरीच राहून जिजाऊंना मानवंदना द्यावी असे आवाहन मराठा सेवा संघ यांच्यासह पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

    follow whatsapp