चंद्रकांत पाटील खरे मास्टरमांईड… सोमय्यांचा टूल म्हणून वापर; हसन मुश्रीफांचा पलटवार

मुंबई तक

• 06:16 AM • 20 Sep 2021

किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत. त्यामागे भाजपचं षडयंत्र आहे. सोमय्या आरोप करत असले, तरी या मागे खरे मास्टरमांईड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केलाचा […]

Mumbaitak
follow google news

किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत. त्यामागे भाजपचं षडयंत्र आहे. सोमय्या आरोप करत असले, तरी या मागे खरे मास्टरमांईड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

हे वाचलं का?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केलाचा दुसरा आरोप केला.

सोमय्यांच्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या व भाजपवर पलटवार केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या सगळ्यामागे असल्याचा दावा करत आपण किरीट सोमय्यांवर ५० लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

‘किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्या मागे भाजपचं मोठं षडयंत्र आहे. चंद्रकांत पाटील याचे खरे मास्टरमांईड आहेत. मी अनेकवेळा शरद पवार आणि राष्ट्रवादीवर व महाविकास आघाडी सरकारबद्दल पत्रकार परिषदा घेतल्या. आवाज उठवला. त्यामुळे भाजपचे नेते मला दाबण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी किरीट सोमय्यांचा टूल म्हणून वापर केला’, असा दावा मुश्रीफांनी केला आहे.

हसन मुश्रीफांवर आणखी 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

‘चंद्रकात पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झालेला आहे. तो कुणी भुईसपाट केला तर हसन मुश्रीफांनी. त्यांनी मागील वेळी मला भाजप येण्याबद्दल म्हटलं होतं. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. दहा वर्ष भाजपला संधी नाही. आज कोल्हापूर जिल्ह्यात ते शून्य आहेत’, असं मुश्रीफ म्हणाले.

‘चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं. माझ्या कुटुंबीयांची बदनामी करुन काही मिळणार नाही. मी आधीच शंभर कोटींचा दावा ठोकणार होतो. आज दुसरा आरोप केला आहे. तो बिनबुडाचा आहे. सोमय्यांची सीएची पदवी नक्की खरीच आहे का? त्यांनी अजूनही अभ्यास करावा. मी त्यांच्याकडे दोन सीए पाठवतो म्हणजे त्यांना मी कसा आहे कळेल’, असं आवाहनही मुश्रीफ यांनी सोमय्यांना केलं.

‘आज त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल त्यांनी आधी माफी मागावी. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्याशी माझा, माझ्या जावयाची काहीही संबंध नाही. मी दोन तास घेऊन माहिती घेतली. ब्रिक्स इंडिया कंपनी ही ४४ लाख शेअर कॅपिटलची कंपनी आहे. एसयू ही शेल कंपनी नाही, ती महाराष्ट्राची कंपनी आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ही निविदा काढली नव्हती. सरकारने हा कारखाना चालवायला दिला होता. २०१२-१३ साली सहयोगी तत्वावर चालवायला दिला होता. ते म्हणतात २०२० ला दिला होता. किती कळस आहे. कंपनीने २०२० मध्ये हा कारखाना सोडला’, अशी माहिती त्यांनी दिली.

Kirit Somaiya: ‘CMO च्या संबंध नाही, सोमय्यांवरील कारवाई गृह मंत्रालयाकडून’, सेनेचा सेफ गेम?

‘शेल कंपनी नाही. ब्रिक्स इंडिया कंपनीला ७५ कोटींचा तोटा आहे. सोमय्यांनी तो भरून द्यावा. सोमय्यांनी गडकरींचा सल्ला घेतलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे पहिला १०० कोटींचा आणि या प्रकरणात ५० कोटी अब्रुनुकसानीचा दावा सोमय्यांविरुद्ध करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले.

    follow whatsapp