बेकायदेशीर धर्मांतराचं बीड कनेक्शन : इरफान शेख नावाच्या व्यक्तीला अटक

मुंबई तक

• 03:06 AM • 29 Jun 2021

उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी दोन मौलवींना अटक केली. खोटी माहिती देत अनेक हिंदु मुला-मुलींना इस्लाम स्विकारायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आता याप्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शनही उघडकीस आलं असून पोलिसांनी बीडमधील इरफान शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. इरफान हा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या शिरसाळा गावातला रहिवासी आहे. इरफान शेख हा केंद्र शासनाच्या […]

Mumbai Tak
Google CTA

उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी दोन मौलवींना अटक केली. खोटी माहिती देत अनेक हिंदु मुला-मुलींना इस्लाम स्विकारायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आता याप्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शनही उघडकीस आलं असून पोलिसांनी बीडमधील इरफान शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. इरफान हा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या शिरसाळा गावातला रहिवासी आहे.

हे वाचलं का?

इरफान शेख हा केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाचा कर्मचारी असल्याचं समोर येतंय. या विभागात इरफान इंटरप्रिटेटर म्हणून काम करत होता. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या इरफानला उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतलंय. इरफानचं प्राथमिक शिक्षण हे शिरसाळ्यात झालं. यानंतर तो प्रोफेसर म्हणून दिल्लीत काम करत असल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी दिली.

अहमदाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इरफानच्या कामाचं कौतुक करुन त्याला शाबासकी दिली होती अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली. बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणात इरफानला अटक झाल्यामुळे त्याच्या घरच्यांना धक्का बसला आहे. इरफान अशा गोष्टी करणं शक्य नसल्याची प्रतिक्रीया त्याच्या घरच्या व्यक्तींनी दिली आहे.

मुकबधिर विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देऊन, हिंदू धर्माविषयी द्वेष निर्माण करुन उत्तर प्रदेशात दोन मौलवी त्यांना इस्लाम स्विकारायला लावत होते. या प्रकरणात सोमवारी पोलिसांनी एकूण तिघांना अटक केली ज्यात इरफान शेखचाही समावेश आहे. याव्यतिरीक्त गुडगाव भागातून मन्नू यादव तर दिल्लीतून राहुल भोला यांना अटक केली आहे. इरफान शेखचा या प्रकरणात नेमका काय हात होता हे मात्र समोर आलेलं नाहीये.

परंतू बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचे धागे थेट महाराष्ट्राशी जोडले गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशात अटक करण्यात आलेल्या दोन मौलवींच्या प्रभावाखाली आलेल्या अनेक मुलांचं सध्या दिल्ली पोलीस त्यांच्या पालकांच्या मदतीने समुपदेशन करत आहेत.