सहा महिन्यानंतर शासनाच्या प्रत्येक खात्यात इलेक्ट्रॉनिक गाड्या असतील : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई तक

• 02:53 PM • 29 Sep 2021

प्रदूषणाचा विचार करता, सर्वांनी इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य देण्याची गरज असून येत्या एप्रिल 2022 पासून शासनाच्या प्रत्येक खात्यात इलेक्ट्रॉनिक गाड्या असतील, अशी घोषणा पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांच्या दौर्‍या वर आले होते.त्यावेळी विधान भवन […]

Mumbaitak
follow google news

प्रदूषणाचा विचार करता, सर्वांनी इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य देण्याची गरज असून येत्या एप्रिल 2022 पासून शासनाच्या प्रत्येक खात्यात इलेक्ट्रॉनिक गाड्या असतील, अशी घोषणा पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

हे वाचलं का?

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांच्या दौर्‍या वर आले होते.त्यावेळी विधान भवन येथे माझी वसुंधरा अभियानाची बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

“जगभरात पर्यावरण आणि प्रदूषण हा मोठा विषय झाला आहे. त्यावर अनेक ठिकाणी चर्चा देखील होत आहे. आपल्या पुण्याचा विचार करता, 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल कसं करता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच पुणे शहरात दर आठवड्याला पर्यावरण रक्षणासाठी नदीकाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. ही चळवळ कशी होईल, यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज असल्याचं”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

तसेच ते पुढे म्हणाले की, वातावरणीय बदलांमुळे जे नुकसान होत आहे ते आपण मोजूही शकत नाही. तसेच मराठवाड्यात झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टी ज्यांचं नुकसान झाले आहे त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीतमध्ये चर्चा झाली आहे. जेवढी मदत आवश्यक आहे, तेवढी निश्चित केली जाईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

अनिल परबांवर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं –

परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या भ्रष्टाचार घोटाळा प्रकरणी त्यांची एडी ने चौकशी केली आहे. या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “पुण्यात आलोय तर पुण्याविषयी बोलेन राजकीय विषयावर मी बोलणार नाही. मी पर्यावरण मंत्री या नात्याने या विषयावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही”, असं बोलून त्यांनी राजकीय प्रश्नावर उत्तर देणे टाळले.

आज पुण्यात येताच आदित्य ठाकरे ह्यांनी चिंचवड येथील कायनेटिक मोटर्स आणि पिंपरी येथील टाटा मोटर्स प्लांटला भेट दिली. कायनेटिक मोटर्स याठिकाणी आदित्य ठाकरे इलेक्ट्रिक बाइसिकल, इलेक्ट्रिक टू व्हीलर, आणि इलेक्ट्रिक ट्रायसिकल रिक्षांची पाहणी केली. राज्यात पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मी आज पिंपरी – चिंचवड शहरातील   इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपन्यांना भेट देत आहे अस आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

    follow whatsapp