मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन

मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन आला होता. या फोनद्वारे बॉम्बस्फोट घडवू अशी धमकी या फोनद्वारे दण्यात आली आहे. वांद्रे RPS कैसर खालिद यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आम्ही सुरक्षा वाढवली आहे. सगळ्या एजन्सीजना आम्ही अलर्ट करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. कोणत्याही प्रकारच्या चिंतेचं किंवा काळजीचं कारण नाही […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:31 PM • 13 Nov 2021

follow google news

मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन आला होता. या फोनद्वारे बॉम्बस्फोट घडवू अशी धमकी या फोनद्वारे दण्यात आली आहे. वांद्रे RPS कैसर खालिद यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आम्ही सुरक्षा वाढवली आहे. सगळ्या एजन्सीजना आम्ही अलर्ट करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. कोणत्याही प्रकारच्या चिंतेचं किंवा काळजीचं कारण नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटांनी हादरली होती. त्यानंतर लोकल बॉम्बस्फोट आणि बेस्ट बसमध्येही बॉम्ब स्फोटांच्या घटना घडल्या होत्या. आता रेल्वे पोलिसांना पुन्हा एकदा मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

7 ऑगस्ट रोजीही एका निनावी फोन कॉलद्वारे सीएसएमटी, दादर, भायखळा आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून तातडीने शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता त्यावेळी शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलीस तपासात हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्यात दिवशी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर रिकामा करण्यात आला. मात्र, बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण मंदिर परिसरात पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही स्फोटक वस्तू किंवा पदार्थ मिळून आला नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर भाविकांसाठी अंबाबाई मंदिर खुलं करण्यात आलं होतं.

    follow whatsapp