राज्यात सत्तांतर झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं. नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक राजकीय नाट्यमय आणि संघर्षमय घडामोडीनंतर हे अधिवेशन होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडतानाही दिसत आहेत.
