एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे असा तपास होता कमा नये !

मुंबई तक

• 02:00 PM • 28 Feb 2021

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प अधिवेशनाआधी राठोडांचा राजीनामा घेऊन सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांच्या हातात असलेला एक मुद्दाच काढून घेतला. संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया देत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. अवश्य वाचा – […]

Mumbaitak
follow google news

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प अधिवेशनाआधी राठोडांचा राजीनामा घेऊन सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांच्या हातात असलेला एक मुद्दाच काढून घेतला. संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया देत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – राजीनामा दिला म्हणून राठोडांचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही !

“संजय राठोड यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण होत आहे. कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष व्हायला पाहिजे. व्यक्ती कितीही मोठा असला तरीही कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल. एखाद्याला आयुष्यातून उठवायचं असं ठरवून तपास करुन चालणार नाही. पोलीस यंत्रणांना याप्रकरणात योग्य तो तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.”

अवश्य वाचा – या ४ कारणांमुळे शिवसेनेला घ्यावा लागला संजय राठोडांचा राजीनामा

यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुजा चव्हाणचे आई-वडिल आपल्याला भेटून गेल्याचं सांगितलं. यावेळी चव्हाण कुटुंबियांनी पत्र लिहून आपल्या मुलीच्या होणारी बदनामी थांबवावी अशी विनंती केल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी लिहीलेलं पत्र वाचून दाखवलं. आम्हाला पोलीसांच्या तपासावर विश्वास आहे. याप्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता कमा नये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.

    follow whatsapp