या ४ कारणांमुळे शिवसेनेला घ्यावा लागला संजय राठोडांचा राजीनामा
पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली राजीनामा सोपवला आहे. पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राठोड यांचं नाव जोडलं गेल्यानंतर जवळपास १५ दिवस ते लोकांसमोर आले नव्हते. यानंतर बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानात राठोडांनी शक्तीप्रदर्शन करत राजीनामा टाळण्याचा प्रयत्न केला. परंतू हेच शक्तीप्रदर्शन त्यांच्या अंगलट आल्याचं बोललं जातंय. गेल्या […]
ADVERTISEMENT

पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली राजीनामा सोपवला आहे. पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राठोड यांचं नाव जोडलं गेल्यानंतर जवळपास १५ दिवस ते लोकांसमोर आले नव्हते. यानंतर बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानात राठोडांनी शक्तीप्रदर्शन करत राजीनामा टाळण्याचा प्रयत्न केला. परंतू हेच शक्तीप्रदर्शन त्यांच्या अंगलट आल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपासून आपली राजीनामा टाळण्याचा प्रयत्न करत असलेल्या संजय राठोड यांचा आजच राजीनामा का घेतला गेला याला अत्यंत महत्व आहे.
संजय राठोड यांच्या विरोधात कोणकोणते मुद्दे तयार झाले की ज्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावाच लागला हे आपण जाऊन घेऊयात…
१) पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाशी नाव जोडलं जाणं –
७ फेब्रुवारीला २२ वर्षांची टीकटॉक स्टार पुजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणात पुणे पोलीस आत्महत्येचा तपास करत होते. मात्र या प्रकरणात संजय राठोड आणि पुजा चव्हाण यांचे फोटो व काही कथित ऑडीओ क्लिप समोर आल्यानंतर विरोधकांकडून राठोड यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी दबाव वाढत होता.