महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचा फोन टॅप होत असल्याचा आरोप यापुर्वी अनेकदा करण्यात आलाय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आव्हाड यांनी मध्यरात्री ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे आव्हाडांचं ट्विट?
मध्यरात्री दीड वाजल्याच्या दरम्यान जितेंद्र आव्हान यांनी हे ट्विट केलं आहे. यामध्ये आव्हाड यांनी आपला फोन टॅप होत असून व्हॉट्सअपवर कोणत्यातरी एजन्सीकडून पाळत ठेवली जात असल्याचं म्हटलंय.
आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचंही नाव घेतलं नाहीये त्यामुळे आव्हाडांचा रोख नेमका कोणाकडे आहे याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही अशाच पद्धतीने फोन टॅपिंगचे आरोप केले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आता यावर काय भूमिका घेतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
