Thackeray Vs Shinde Live Update : दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला, थोड्याच वेळात निर्णय

२०१९ मध्ये सत्तेत आलेलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार टिकणार की जाणार? अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनाही बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. न्यायालयातील सुनावणीचे सर्व अपडेट पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओवर क्लिक करा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:41 PM • 29 Jun 2022

follow google news

२०१९ मध्ये सत्तेत आलेलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार टिकणार की जाणार? अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनाही बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.

हे वाचलं का?
न्यायालयातील सुनावणीचे सर्व अपडेट पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओवर क्लिक करा

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. याला शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निकाल देणार हे महत्त्वाचं असणार आहे.

१) सर्वोच्च न्यायालय राज्यपालांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देऊ शकतं. त्यामुळे उद्या होऊ घातलेल्या बहुमत चाचणीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

२) सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचं म्हणणं ऐकून घेतलं, तर आधी बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या प्रकरणात कार्यवाही करू शकते.

३) बहुमत चाचणी उद्या न घेता दुसऱ्या इतर दिवशी घेण्यात यावी, असंही न्यायालय सांगू शकतं. त्यामुळे उद्याच होणारी बहुमत चाचणीची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

४) शेवटची शक्यता अशी व्यक्त केली जात आहे की, या प्रकरणावर सविस्तरपणे चर्चा करण्याची गरज असल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालय बहुमत चाचणीला तात्पुरती स्थगिती देऊ शकतं.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी आज गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही उद्या मुंबईत पोहोचू. आमच्यासोबत ५० आमदार आहेत. दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही. आम्ही सर्व काही मंजूर करू आणि आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. लोकशाहीमध्ये बहुमत जास्त महत्त्वाचं असतं आणि ते आमच्याकडे आहे,” असं शिंदे यांनी सांगितलं.

शिवसेना बंडखोर आमदार जाणार भाजपसोबत?

बहुमत चाचणीवेळी शिवसेनेतील बंडखोर आमदारांची भूमिका काय असणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. बंडखोर आमदार गुवाहाटीतून गोव्याला येणार आहेत आणि त्यानंतर मुंबईत येणार आहेत. गुवाहाटीतून रवाना होण्यापूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

बहुमत चाचणीवेळी भाजपसोबत जाण्याचे संकेत केसरकर यांनी दिले आहेत. “आमच्याकडे दोनच पर्याय आहेत. पहिला म्हणजे आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं किंवा भाजपसोबत जाणं. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचं नाहीये.”

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. धमकीचं पत्र त्यांना पाठवण्यात आलं असून, पत्रात नावाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. बलात्कार करू असंही या पत्रात म्हटलेलं आहे.

Mumbai :किशोरी पेडणेकरांना जिवे मारण्याची धमकी, पत्रात अश्लील भाषेसह शिव्याही

नवाब मलिक, अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

बहुमत चाचणीविरुद्ध शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली असतानाच, आता राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी दरवाजे ठोठावले आहेत. विधानसभेत उद्या बहुमत चाचणी होणार आहे. बहुमत चाचणीस उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मलिक आणि देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

राज्यपालांनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेवर आजच सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्या कांत आणि जेबी पारडियावाला यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. शिवसेनेच्या मागणीला एकनाथ शिंदे यांच्या विरोध केला. बहुमत चाचणी घेण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आज सायंकाळी ५ वाजता सुनावणी घेण्यास होकार दिला.

फडणवीसांच्या घरी तातडीची बैठक, भाजप आमदारांना ‘ताज’ला बोलावलं

बहुमत चाचणीसाठी उद्या विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहे. सरकार वाचवण्यासाठी एकीकडे शरद पवारांच्या घरी बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दुपारी २ वाजता बैठक होणार आहे.

शिवसेनेत बंडखोरी उफाळून आल्यानंतर भाजपने त्यांच्या आमदारांना राज्यातच थांबण्याचे आदेश दिले होते. आता बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमदारांना ताज हॉटेलमध्ये जमण्यास सांगण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदेंची बंडखोरी ते भाजपची एन्ट्री! आठ दिवसात काय काय घडलं?

शिवसेनेनं ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेनं याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अभिषेक मनू सिंघवी शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.

‘सिल्व्हर ओक’वर खलबतं

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी काही तासांचाच अवधी दिला गेला असल्यानं सरकारमधील तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. शरद पवार यांच्या घरी नेते पोहोचले आहेत. काँग्रेसचे सुनील केदार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनीत तटकरे आणि दिलीप वळसे पाटील हे बैठकीसाठी पोहोचले आहेत.

ठाकरे सरकारची उद्याच ‘बहुमताची परीक्षा; राज्यपालांनी पत्रात काय म्हटलंय?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपबरोबरच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

“हा अन्यायच नाही, तर घटनेची पायमल्ली”

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे. “16 आमदार निलंबन प्रकरणी दोन दिवस कमी मुदत दिली म्हणून कोर्ट आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदत देते आणि राज्याच्या विधानसभेचे आधिवेशन १ दिवसात बोलावतात, हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे,” असं राऊत यांनी म्हटलंय.