11 tigers died in Maharashtra : राज्यात 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू, MP च्या शिकारी टोळीचं काम?

योगेश पांडे

29 Jan 2025 (अपडेटेड: 29 Jan 2025, 09:57 AM)

काही वाघांची शिकार झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशाच्या बहेलिया टोळीचे शिकारी महाराष्ट्रातील ताडोबा, पेंच आणि मेळघाट सारख्या भागात वाघांची शिकार करत आहेत.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 11 वाघांचे मृत्यू

point

विदर्भात झालेल्या वाघांच्या मृत्यूने खळबळ

Tiger Died in Maharashtra : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्याघ्र प्रेमींसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 2025 सुरुवातीलाच विदर्भात वाघांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून विदर्भात 22 दिवसांत एकूण 11 वाघांचा मृत्यू झाला आहे. या 11 मृत्यूंपैकी दोन वाघांची शिकार झाल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका वाघाची शिकार करण्यात आली, तर भंडारा जिल्ह्यात शिकारीमुळे दुसऱ्या वाघाचा मृत्यू झाला. या दोन घटनांपैकी एका प्रकरणात वाघाचे तीन तुकडे करण्यात आले होते, तर दुसऱ्या प्रकरणात वाघाचे नख आणि दात काढलेलं आढळलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Santosh Deshmukh Murder Case: 'धनंजय मुंडेंची ED चौकशी करा', थेट कोर्टातच...

एका ठिकाणी 5 ते 6 महिन्यांच्या दोन वाघांच्या पिल्लांचे मृतदेह सापडले. दोन वाघांचा मृत्यू परस्परांच्या मारामारीत झालेल्या जखमांमुळे झाला असल्याचंही समोर आलं आहे. त्याचवेळी, इतर मृत्यू देखील संशयास्पद मानले जात आहेत. राज्यात वाघांच्या शिकारीचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. 2025 हे वर्ष वाघांच्या मृत्यूनं सुरू झालं आहे. अवघ्या 22 दिवसांत 11 वाघांचे मृत्यू होणं हे अतिशय गंभीर आणि चिंताजनक मानलं जातंय.

हे ही वाचा >>Kumbh Mela Stampede : चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथ यांचे 2 फोन

मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीचे शिकारी महाराष्ट्रातील ताडोबा, पेंच आणि मेळघाट सारख्या भागात वाघांची शिकार करत आहेत. दोन वर्षांपूर्वी, बावरिया नावाच्या वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीनेही महाराष्ट्रात वाघांची शिकार केली होती. या वर्षी झालेल्या 11 मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांबाहेर झाले आहेत. या संपूर्ण विषयावर आज तकने वन विभागाचे अधिकारी गिरीश वशिष्ठ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की जानेवारी महिन्यात 11 वाघांचा मृत्यू झाला.

11 वाघांचे मृत्यू कुठे कुठे झाले?

1: 2 जानेवारी 2025- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी सिंदेवाही गावात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला.

2: 6 जानेवारी 2025- भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार करण्यात आली. तीन तुकडे केले.

3: 7  जानेवारी 2025- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्राजवळ वाघाची शिकार करण्यात आली. वाघाचे दात आणि नखे गायब होते.

4: 8 जानेवारी 2025-  देवलापार वनपरिक्षेत्रात उपासमारीमुळे वाघाच्या पिल्लाचा मृत्यू झाला.

5: 9 जानेवारी 2025- चंद्रपूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मोठ्या वाघाने एका पिल्लाला ठार मारलं.

6: 14  जानेवारी 2025- गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात संसर्गामुळे वाघाच्या पिल्लाचा मृत्यू झाला.

7: 15 जानेवारी 2025 - देवलापार वनपरिक्षेत्रात एका वाघाचा उपासमारीने मृत्यू झाला.

8: 19  जानेवारी 2025- बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा (मादी) मृत्यू झाला.

9: 20  जानेवारी 2025- ताडोबा बफर झोनच्या शिवनी वनपरिक्षेत्रात दोन वाघांमधील झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला.

10 : 22  जानेवारी 2025- पेंच व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा मृतदेह आढळला.

11 : 22 जानेवारी 2025- वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील गिरड परिसरात एका वाघाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.