Maratha Reservation : ‘जरांगेना मुंबईत येण्याचा अधिकार नाही’, गुणरत्न सदावर्ते असं का म्हणाले?

प्रशांत गोमाणे

• 02:08 PM • 24 Jan 2024

मनोज जरांगेंना कायदेशीरदृष्टया मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही आहे. जर जरांगेनी तसा प्रयत्न केला तर पोलिसांना अॅक्शन मोडवर यावे लागेल. कारण आता न्यायालयाचा आदेश आहे, राज्य सरकारचा आदेश नाही आहे, असे सदावर्ते यांनी सांगितले.

maratha reservation gunaratna sadavarte reaction on manoj jarange morcha and mumbai high court petition decision

maratha reservation gunaratna sadavarte reaction on manoj jarange morcha and mumbai high court petition decision

follow google news

Gunaratna Sadavarte Reaction Manoj jarange Morcha : देशात कायदा मोठा आहे आणि जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे मनोज जरांगेंना कायदेशीरदृष्टया मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही आहे. जर जरांगेनी तसा प्रयत्न केला तर पोलिसांना अॅक्शन मोडवर यावे लागेल, असे विधान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी पार पडल्यानंतर सदावर्ते माध्यमांशी बोलत होते. (maratha reservation gunaratna sadavarte reaction on manoj jarange morcha and mumbai high court petition decision)

हे वाचलं का?

हायकोर्ट काय म्हणाले?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज बुधवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने मराठा मोर्चेकरी मुंबईत धडकल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट केले आहे. जरांगे पाटलांना नोटीस द्या आणि कोर्टात हजर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदान पोलिसांना दिले आहेत. आझाद मैदानाची क्षमता 5 हजारांचीच, या सदंर्भात जरांगेना माहिती द्या, असे कोर्टाने सुनाणीत म्हटले आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘…तर आंदोलनाचा मार्ग योग्यच’, जरांगेंच्या पदयात्रेवर CM शिंदे काय म्हणाले?

मनोज जरांगेंना कायदेशीरदृष्टया मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही आहे. जर जरांगेनी तसा प्रयत्न केला तर पोलिसांना अॅक्शन मोडवर यावे लागेल. कारण आता न्यायालयाचा आदेश आहे, राज्य सरकारचा आदेश नाही आहे, असे सदावर्ते यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी या गोष्टीची जबाबदारी स्विकारली पाहिजे आणि मंत्री काय बोलतात याकडे लक्ष न देता कोर्टाचा निकाल हा कायदेस्वरूप असतो, त्याकडे लक्ष दिले पाहिजे.उच्च न्यायालयाचा आदेश कायदा म्हणून पाहिला जातो आणि जरांगेंना हाजीर हो सांगितलेले आहे. ही मोठी उपलब्धी असल्याचे सदावर्ते सांगतात. तसेच कायदा मोठा आहे आणि जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असे देखील सदावर्ते यांनी सांगितले.

दरम्यान सदावर्ते यांच्या या प्रतिक्रियेवर जरांगे म्हणाले की, न्याय मंदिर आम्हाला न्याय देणार,आमचे वकील बघतील न्यायालयाचे काय निर्देश आहेत ते. आणि सदावर्तेंना मराठे घाबरत नाही त्यांना बघून घेऊ,असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

    follow whatsapp