Mhada ची दिवाळीत 3 हजार घरांची सोडत, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

मुंबई तक

• 01:19 PM • 02 Jun 2022

म्हाडाने (MHADA) मुंबईकरांना दिवाळीचं बंपर गिफ्ट दिलं आहे. मुंबईतल्या 3 हजार घरांसाठीची सोडत निघणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांचं स्वप्न या निमित्ताने पूर्ण होण्यास मदत होऊ शकणार आहे. पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडाच्या प्रकल्पाला भेट देऊन प्रगती […]

Mumbaitak
follow google news

म्हाडाने (MHADA) मुंबईकरांना दिवाळीचं बंपर गिफ्ट दिलं आहे. मुंबईतल्या 3 हजार घरांसाठीची सोडत निघणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांचं स्वप्न या निमित्ताने पूर्ण होण्यास मदत होऊ शकणार आहे.

हे वाचलं का?

पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडाच्या प्रकल्पाला भेट देऊन प्रगती पथावर असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. दिवाळीत 3 हजार घरांची सोडत निघेल असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच म्हाडाने उत्पन्न मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे म्हाडाचं घर घ्यायचं असेल तर जास्त पैसे भरण्याची तयारी मात्र ठेवावी लागणार आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट?

पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल.

नव्या घरांसाठी उत्पन्न मर्यादा किती आहे?

अत्यल्प गट-वार्षिक 6 लाख रूपये

अल्प गट-वार्षिक 6 ते 9 लाख रूपये

मध्यम गट-वार्षिक 9 ते 12 लाख रूपये

उच्च गट-वार्षिक 12 ते 18 लाख रूपये

जुनी उत्पन्न मर्यादा अत्यल्प गटासाठी 25 हजार रूपये महिना पगार, अल्प गटासाठी 25 ते 50 हजार रूपयांपर्यंतची पगाराची मर्यादा मध्यम गटासाठी 25 हजार ते 50 हजारांपर्यंत प्रति माह पगार असणाऱ्यांसाठीची, उच्च गट 75 हजार रूपये प्रति माह पगार असणाऱ्यांसाठी होता. मात्र आता म्हाडाने उत्पन्नाची मर्यादा वाढवली आहे.

    follow whatsapp