सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली; मनसे आमदार राजू पाटील यांची टीका

मुंबई तक

• 04:39 AM • 27 Aug 2022

शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. समविचारी म्हणून आम्ही एकत्र आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अशात आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. सत्तेविना मती गेली, मिळेल त्याच्याशी युती केली असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी युती केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. समविचारी म्हणून आम्ही एकत्र आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अशात आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. सत्तेविना मती गेली, मिळेल त्याच्याशी युती केली असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी युती केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका होऊ लागली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी?

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटर आणि फेसबुक पोस्ट केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात नवं समीकरण तयार होणार का? या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट आणि फेसबुकच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सत्तेविना मती गेली, मिळेल त्याच्याशी युती केली असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. राजू पाटील यांनी केलेलं हे ट्विट आणि फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती

मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे हे उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले, ‘संभाजी ब्रिगेड गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्रात शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, भारताचं संविधान आणि लोकशाही ही मानवी मूल्ये घेऊन महाराष्ट्रात काम करत आहे.”

“आम्ही २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडचं राजकीय पक्षामध्ये रुपांतर केलं आहे. महाराष्ट्रातील आजचं वातावरण… गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका मांडली. जे निर्णय घेतले. फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार त्यांनी आक्रमकपणे मांडला. संघप्रणित विषमतावादी विचारधारा आहे. तिला सर्वशक्तीशी विरोध केला. लोकांच्या बाजूने राहिले. आता लोकशाही धोक्यात आहे. छोटे पक्ष, सामाजिक संघटना, विचारधारा अस्तित्वा ठेवायची असेल, तर हे समीकरण जुळवावं लागेल, यावर आमचं एकमत झालं.”

“एक वैचारिक जनआंदोलन महाराष्ट्रात उभं राहिल. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि भारताचं संविधान यांना मानणारा नवसमाज व लोकांचे हक्क अधिकार मिळावेत आणि भारतीय लोकशाही घराघरात जावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं बनबरे म्हणाले.

    follow whatsapp