मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुरेश नगरमध्ये गुरुवारी संध्याकाळी एक घटना धक्कादायक घटना घडली. एका मुलीनं आपल्याच आईची हत्या केल्याचं समजल्यानंतर संपूर्ण परिसर हादरला. चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास 40 वर्षीय रेश्माने तिची 60 वर्षीय आई साबिरा बानो यांच्यावर चाकूने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, साबिरा बानो यांचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्माने पोलिसांना सांगितलं की, तिची आई तिच्यावर प्रेम करत नव्हती आणि तिच्या इतर बहिणींवर प्रेम होती. याच कारणावरून त्यांच्या घरात वारंवार भांडणं होत होती. घटनेच्या वेळी घरात फक्त रेश्मा आणि तिची आई होती. रागाच्या भरात रेश्माने हे भयानक पाऊल उचललं.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case Beed : संतोष देशमुख प्रकरणात SIT कडून डॉक्टर ताब्यात, 'या' आरोपीला मदत केल्याचा संशय
या घटनेनंतर रेश्माने स्वत: पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रेश्माला अटक केली आहे. तिची चौकशी सुरू आहे. रेश्मा विवाहित असून, ती तीन मुलांची आई आहे. एकीकडे स्वत:चं संपूर्ण कुटुंब असताना आईवर असा आरोप करत हा खून केल्यानं सगळेच हादरले आहेत.
हे ही वाचा >> वाल्मिक कराडला आहे 'हा' आजार... नेमकं काय होतं त्यात?
एकूणच या घटनेमुळे रेश्माच्या मुलांच्या आणि पतीच्या आयुष्यावरही परिणाम होणार आहे. ही घटना नुसती हत्या नसून, एका कुटुंबाच्या उध्वस्त होण्याची वेदनादायक कहाणी आहे. पोटच्या मुलीनं आईलाच संपवल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT











