देशात 60 हजार किमीचा ‘World Class Highway’ बनविण्याचं लक्ष्य 2024 पर्यंत पूर्ण करणार-गडकरी

मुंबई तक

• 05:09 AM • 10 Jul 2021

देशात 60 हजार किमीचा वर्ल्ड क्लास नॅशनल हायवे बनवणं हे माझं स्वप्न आहे आणि ते मी 2024 पर्यंत पूर्ण करणार असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी रस्ते विकास प्राधिकारणाच्या 16 व्या वार्षिक समारंभात सभगा घेतला होता. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दिवसाला 40 किमीचा रस्ता तयार करण्यात येईल असंही […]

Mumbaitak
follow google news

देशात 60 हजार किमीचा वर्ल्ड क्लास नॅशनल हायवे बनवणं हे माझं स्वप्न आहे आणि ते मी 2024 पर्यंत पूर्ण करणार असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी रस्ते विकास प्राधिकारणाच्या 16 व्या वार्षिक समारंभात सभगा घेतला होता. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दिवसाला 40 किमीचा रस्ता तयार करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हे वाचलं का?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रस्ते बांधणीच्या कामासाठी आणि दूरदृष्टीसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा देशातली दळवणळण यंत्रणा बळकट करण्यासाठी होतो आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे ही कल्पना नितीन गडकरी यांच्याच डोक्यातली. त्यामुळे मुंबई ते पुणे हे अंतर कापण्यासाठी लागणारा 5 ते 6 तासांचा वेळ हा अवघा अडीच-तीन तासांवर आला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी देशातील विविध भागांमध्ये रस्ते रूंदीकरण आणि नव्याने रस्ते बांधणी करण्यासाठी लाखो कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. अनेक ठिकाणी या संदर्भातल्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत.

भारतात साधारण 63 लाख किलोमीटरचे रस्ते दळणवळण आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग हा आपल्या देशात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत दळवळण रस्ते हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती देण्याचं कामही होतं असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. सरकार कडून 1.4 ट्रिलियन डॉलर नॅशन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठी मंजूर करण्यात आले आहेत असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं. या क्षेत्रासाठी सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पात जवळपास ३४ टक्के वाढ केली जाते. यंदाही निधी वाढवून दिला आहे असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

रस्ते पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, कारण 70 टक्के वस्तू आणि सुमारे 90 टक्के प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर करत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांत भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे गडकरी म्हणाले. सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलचा उपयोग रस्ते उपकरणाच्या यंत्रणेसाठी करावा. आयातीवर निर्बंध लादणे, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी पद्धती आणि पर्यायी इंधन विकासावर त्यांनी भर दिला.

    follow whatsapp