मुंबई: पत्र्यावर अडकलेला बॉल काढणं बेतलं जीवावर, हाय व्होल्टेज तारेला चिकटून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई तक

• 12:19 PM • 17 Dec 2021

झाका मेस्त्री, नालासोपारा: पत्र्यावर अडकलेला बॉल काढण्याच्या नादात एका 10 वर्षीय मुलाने आपला हकनाक जीव गमावल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. हाय व्होल्टेज तारेला मुलाचे केस चिकटल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचं समजतं आहे. नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग परिसरातील राशीद कंपाउंडमध्ये एक 10 वर्षीय मुलगा पत्र्यावरून गेलेल्या हाय व्होल्टेज केबलला चिकटून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली […]

Mumbaitak
follow google news

झाका मेस्त्री, नालासोपारा: पत्र्यावर अडकलेला बॉल काढण्याच्या नादात एका 10 वर्षीय मुलाने आपला हकनाक जीव गमावल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. हाय व्होल्टेज तारेला मुलाचे केस चिकटल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचं समजतं आहे.

हे वाचलं का?

नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग परिसरातील राशीद कंपाउंडमध्ये एक 10 वर्षीय मुलगा पत्र्यावरून गेलेल्या हाय व्होल्टेज केबलला चिकटून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृत मुलाचं नाव प्रत्यक्ष यादव असं आहे.

प्रत्यक्ष यादव हा खेळत असताना त्याचा चेंडू हा पत्र्यावर अडकला. त्यामुळे तो अडकलेला चेंडू काढण्यासाठी प्रत्यक्ष थेट घराच्या छतावर चढला होता. पण घराच्या छतावरुन हाय व्होल्टेज केबल गेली असल्याचा कोणताही अंदाज प्रत्यक्षला आला नाही. त्यामुळे तो पत्र्यावर बिनधास्त चढला.

पत्र्यावर चढताच हाय व्होल्टेज केबलला त्याच्या केसांचा स्पर्श झाला आणि प्रत्यक्ष केबलाच चिकटला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या काही क्षणात झालेला हा प्रकार अत्यंत धक्कदायक असाच होता. नेमकं काय झालंय हे कळण्यासाठी देखील बराच वेळ गेला.

फक्त एका बॉलसाठी मुलाला आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर आपल्या 10 वर्षाच्या मुलाचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने यादव कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.

या परिसरात अनेक बेकायदा चाळींचे बांधकाम करण्यात आले आहे. दुसरीकडे या भागात हायव्होल्टेज विजेच्या तारांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे बिल्डर आणि महावितरणाच्या गलथान कारभारामुळे चिमुकल्याचा बळी गेला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे.

दुर्दैवी ! उसाच्या फडात पाचोळ्याला लागली आग, अकरा महिन्याच्या मुलीचा भाजून मृत्यू

याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, या घटनेनंतर महावितरणावर आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी सध्या केली जात आहे.

    follow whatsapp