पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत, नाशिकमधल्या खरशेत गावातल्या महिलांचे हाल

मुंबई तक

• 11:53 AM • 04 Jan 2022

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करण्याची वेळ नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत गावातल्या महिलांवर आली आहे. सागाच्या एका फळीवरून पाण्यासाठी जीव मुठीत घ्यावा लागतो आहे. अनेक योजना गावात येतात; परंतु वस्तीपर्यंत पोचत नाहीत, ही येथील आदिवासींची व्यथा आहे. वस्तीपासून नदी जवळ आहे; पण पाणी शुद्ध नसल्याने झऱ्यांमधून महिलांना पाणी आणावे लागते. झरे नदीच्या […]

Mumbaitak
follow google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

हे वाचलं का?

पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करण्याची वेळ नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत गावातल्या महिलांवर आली आहे. सागाच्या एका फळीवरून पाण्यासाठी जीव मुठीत घ्यावा लागतो आहे. अनेक योजना गावात येतात; परंतु वस्तीपर्यंत पोचत नाहीत, ही येथील आदिवासींची व्यथा आहे. वस्तीपासून नदी जवळ आहे; पण पाणी शुद्ध नसल्याने झऱ्यांमधून महिलांना पाणी आणावे लागते. झरे नदीच्या पलीकडे असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत येथील महिलांना करावी लागत आहे.

नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या खरशेत ग्रामपंचायतीच्या परिसरात बारा पाडे आहेत. गावातील पाड्यातील वस्तीवरील अनेक कुटुंब शेतीसाठी पाड्यापासून दीड किलोमीटरवरील तास नदीच्या काठी वास्तव्यास आहेत. हा भाग सखल जमिनीपेक्षा काहीसा उंचावर आहे. सह्याद्रीच्या डोंगरामाथ्यामधून वाहणारी नदी येथे काळ्या खडकांमधून वाहते. काही ठिकाणी हा खडक 25 फूट तर 45 फुटांपेक्षाही सरळ उभा आहे, पण पावसाळ्याचे दिवस सोडले तर येथे पाणी येथे नसते, सखल भागातून येथे पाणी वाहून आणावे लागते, पण सखल भागातून पाणी आणताना महिलांना नदी ओलांडून जावे लागते.

पंचवीस वस्त्यांमधील आदिवासी वस्त्यांमधील महिलांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर टाकण्यात आलेल्या बल्ल्यांवरून चालत जाण्याची, डोंबाऱ्यापेक्षाही भयानक अशी जिवघेणी कसरत दररोज करावी लागते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा पैकी शेंद्रीपाडा येथील महिलांचा हंडाभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले. यानंतर प्रशासन खडबडून जागे होत घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी आता लोखंडी पूल बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक शेतकरी तुकाराम बुधा गांगोडे यांनी स्वतःचा गट क्रं. 242 मध्ये विहीरला जागा देण्यास सहमती दिली आहे. ह्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने दखल घेतली आहे.

सोमवारी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, काय उपाययोजना करता येतील याची ग्रामस्थांशी चर्चा ही केली, यावर लोखंडी पूल बनवावा यावर एकमत होऊन मोजमाप ही घेतली गेले, आता लालफितीच्या कारभारात किती वेगाने हा पूल मंजूर होऊन उभा राहतो हे बघावे लागेल.

    follow whatsapp