“रोहित पवारांचं भविष्य भाजपच्या लोकांनी सांगितलं”, शरद पवारांना नेमकं काय म्हणायचं आहे?

मुंबई तक

29 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:48 AM)

रोहित पवार हे सध्या ईडीच्या रडारवर आले आहेत. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. याबाबत शरद पवारांना आज ठाण्यात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हटलं आहे शरद पवारांनी? रोहित पवारांच्या संदर्भात काय होणार आहे याचं भविष्य भाजपच्या लोकांनी आधीच सांगितलं. आजकाल महाराष्ट्रात […]

Mumbaitak
follow google news

रोहित पवार हे सध्या ईडीच्या रडारवर आले आहेत. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. याबाबत शरद पवारांना आज ठाण्यात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे शरद पवारांनी?

रोहित पवारांच्या संदर्भात काय होणार आहे याचं भविष्य भाजपच्या लोकांनी आधीच सांगितलं. आजकाल महाराष्ट्रात असे लोक आहेत जे सांगत असतात की असं घडणार आहे. यांच्या घरावर धाड पडणार आहे. यांच्याकडे असं असं घडणार आहे असे नेते आहेत. अधिकृत माहिती मिळाल्याचं भासवून लोक असं करत असतात. असा एक वर्ग महाराष्ट्रात तयार झाला आहे लोक त्यासंबंधी योग्य विचार करतील. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांचं नाव न घेताही टोला लगावला आहे. आपल्याला कुठूनतरी माहिती मिळाली आहे असा भास निर्माण करून त्यावर भाष्य करणारा वर्ग महाराष्ट्रात तयार झाला आहे. त्यांच्याबाबत लोक योग्यवेळी निर्णय घेतली असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 दरम्यान संचालक होते. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही 2006 ते 2009 दरम्यान कंपनीचे संचालक होते. त्यावेळी कंपनीत येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याही सहभाग होता. मात्र, येस बँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.

याशिवाय या कंपनीत संचालक असणारे इतर सदस्य हे सध्या वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले त्यावेळी हळूहळू इतर चार सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले.

याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडीने या प्रकरणात ग्रीन एकर कंपनीच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याचा बारकाईने तपास करण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईडीला या कंपनीत अनेक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार प्राप्त झाली असल्याची माहिती आहे. कंपनीत जवळपास १० कोटी रुपयांचा बेहिशेबी व्यवहार झाला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

    follow whatsapp