शरजील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके द्या-निलेश राणे

“शरजील उस्मानीने हिंदू समाजावर टीका केली आहे. त्याच्याविरोधात फक्त FIR दाखल करण्यात आली आ. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे. पुन्हा कुठल्याही शरजील उस्मानीची हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये” असं म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरजील उस्मानीवर टीका केली आहे. शरजील उस्मानीने एल्गार परिषदेत जे भाषण केलं त्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:49 AM • 03 Feb 2021

follow google news

“शरजील उस्मानीने हिंदू समाजावर टीका केली आहे. त्याच्याविरोधात फक्त FIR दाखल करण्यात आली आ. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे. पुन्हा कुठल्याही शरजील उस्मानीची हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये” असं म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरजील उस्मानीवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

शरजील उस्मानीने एल्गार परिषदेत जे भाषण केलं त्या भाषणात हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं. त्यामुळे आता भाजपने त्याच्याविरोधात राज्य सरकारने कठोर कारवाईची मागणी केली आहे. अशात आता निलेश राणे यांनी नुसता एफआयआर नको त्याला भर चौकात फटके द्या अशी मागणी केली आहे.

काय म्हणाला होता शरजील उस्मानी?

“आजका हिंदू समाज, हिंदुस्तानमें हिंदू समाज बुरी तरीकेसे सड चुका है. ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते हैं. ये कत्ल करने के बाद अपने घर जाते हैं तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीकेसे हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे. क्या करते हैं ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते हैं, उठते बैठते हैं, फिल्में देखते हैं. अगले दिन किसीको पकडे हैं फिर कत्ल करते हैं और नॉर्मल लाईफ जीते हैं. अपने घर मे मोहब्बत कर रहें है, अपने माँ बाप के पैर भी छू रहें है, मंदिरमें पूजाभी कर रहै हे, फिर बाहर आकर यही करते हैं… “

शरजील उस्मानीच्या या भाषणावरुन मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात फडणवीस यांनी शरजील उस्मानीवर कठोर कारवाई करा अशीही मागणी केली होती.

    follow whatsapp