वर्ध्याजवळ द्राक्षाच्या ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू; संधीसाधू लोकांनी मारला द्राक्षांवर डल्ला

मुंबई तक

• 07:13 AM • 15 Feb 2022

अनेकदा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणं हा मानवधर्म म्हणून ओळखला जातो. परंतू अनेकदा काही लोकं संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करायची सोडून स्वतःचा स्वार्थ साधताना पहायला मिळतात. वर्ध्यात घडलेल्या एका रस्ते अपघातात असचं चित्र पहायला मिळालं. वर्ध्यावरुन नागपूरकडे जाणाऱ्या एका द्राक्षाच्या ट्रकचा अपघात झाला, ज्यात चालकाला आपले प्राण गमवावे लागले आणि एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला. […]

Mumbaitak
follow google news

अनेकदा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणं हा मानवधर्म म्हणून ओळखला जातो. परंतू अनेकदा काही लोकं संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करायची सोडून स्वतःचा स्वार्थ साधताना पहायला मिळतात. वर्ध्यात घडलेल्या एका रस्ते अपघातात असचं चित्र पहायला मिळालं. वर्ध्यावरुन नागपूरकडे जाणाऱ्या एका द्राक्षाच्या ट्रकचा अपघात झाला, ज्यात चालकाला आपले प्राण गमवावे लागले आणि एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला.

हे वाचलं का?

परंतू यावेळी लोकांनी रस्त्यावर सांडलेली द्राक्ष पळवून नेण्यात धन्यता मानली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

रविवारी मध्यरात्री वर्ध्याच्या केळापूर शिवारात हा अपघात घडला. रवी भास्कर जाधव (वय २६, बुलढाणा) असं या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. रवी हा ट्रक वर्ध्यावरुन नागपूरच्या बाजारात घेऊन चालला होता. मध्यरात्री घडलेल्या अपघातानंतर या ट्रकमधील द्राक्षांचा सडा दिवसभर रस्त्यावर पडून होता. सकाळी या रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी मग संधीचा फायदा घेत ही द्राक्ष पळवली.

असा घडला अपघात –

मिळालेल्या माहितीच्या आधारावर, द्राक्षांचा ट्रक हा नागपूरच्या दिशेने जात असल्याने ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रकने वर्ध्याकडे येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात द्राक्षांच्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला. तसेच ट्रकचा क्लिनर या अपघातात गंभीर जखमी झाला. पुलगाव पोलिसांना माहिती मिळताच अपघातस्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंगी येथील रुग्णालयात पाठविला आहे.

या भीषण अपघातात ट्रकचा समोरील भाग पूर्णत: मोडूला असून, केबिन पूर्णतः मोडली आहे. यामध्ये रात्रीच्या काळोखात अपघात झाल्याने काही वेळापर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच ज्या ट्रकला धडक दिली. त्या ट्रकमधील चालक अमोल घुगरे रा. अहमदनगर आणि क्लिनर शेख गफ्फार शेख रहीम यांना किरकोळ मार लागला असून, त्यांच्या ट्रकचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परंतू या अपघातानंतर स्थानिक लोकांनी ज्या पद्धतीने संधीसाधूपणा दाखवत द्राक्ष पळवली ते पाहून माणुसकी हरवत चालली आहे का असा प्रश्न विचारला जातोय.

मुंबई-पुणे महामार्गावर सहा वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, तिघे जखमी

    follow whatsapp