केरळमध्ये डाव्यांना मोठा धक्का, तिरुवनंतपुरम महापालिकेत कमळ फुललं; 45 वर्षांच्या सत्तेला सुरुंग

Thiruvananthapuram Corporation Election Result : डाव्या आघाडीला 29 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसप्रणीत यूडीएफला 19 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित दोन जागा अपक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. बहुमतासाठी भाजपला आता केवळ एका जागेची गरज असून, सत्तास्थापनेचे गणित त्यांच्या बाजूने झुकलेले दिसते.

Thiruvananthapuram Corporation Election Result

Thiruvananthapuram Corporation Election Result

मुंबई तक

14 Dec 2025 (अपडेटेड: 14 Dec 2025, 11:41 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

केरळमध्ये 'लाल किल्ला' ढासळला

point

तिरुवनंतपुरममध्ये कमळ फुललं

point

डाव्यांच्या 45 वर्षांच्या सत्तेला सुरुंग

तिरुवनंतपुरम : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. अनेक वर्षांपासून डाव्या आघाडीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागांत काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) लक्षणीय यश मिळवत डाव्यांच्या वर्चस्वाला जबर धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, राजधानी तिरुवानंतपुरम महापालिकेत तब्बल 45 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून लावत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) इतिहास रचला आहे.

हे वाचलं का?

राज्यातील बहुतांश स्थानिक संस्थांमध्ये यूडीएफने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांत मतदारांनी डाव्या आघाडीपासून दूर जात पर्याय शोधल्याचे चित्र दिसून आले. या निकालांनंतर काँग्रेस नेत्यांनी ‘केरळमधील लाल किल्ल्याला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डाव्यांच्या सातत्यपूर्ण सत्तेला मिळालेला हा धक्का आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा : राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढलं; आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

या निवडणुकीचा सर्वाधिक गाजलेला निकाल तिरुवानंतपुरम महापालिकेचा ठरला आहे. 101 वार्डांच्या या महापालिकेत भाजपने 50 जागांवर विजय मिळवत सर्वाधिक ताकदवान पक्ष म्हणून पुढे येण्याची कामगिरी केली आहे. डाव्या आघाडीला 29 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसप्रणीत यूडीएफला 19 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित दोन जागा अपक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. बहुमतासाठी भाजपला आता केवळ एका जागेची गरज असून, सत्तास्थापनेचे गणित त्यांच्या बाजूने झुकलेले दिसते.

राजधानीतील या यशामुळे भाजपच्या राज्यातील उपस्थितीला नवे बळ मिळाले आहे. आतापर्यंत केरळमध्ये मर्यादित प्रभाव असलेल्या भाजपसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिरुवानंतपुरम महापालिकेतील या विजयाबद्दल भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, 2026 मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे पाहिले जात आहे. डाव्यांची पीछेहाट, यूडीएफची मुसंडी आणि भाजपचा राजधानीतला उदय यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. स्थानिक पातळीवरील हा कौल पुढील विधानसभा निवडणुकीत कितपत परिणाम घडवतो, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोल्हापूर : पाठीवरच्या बॅगेत दगड भरले अन् डॉक्टर तरुणाची राजाराम तलावात उडी, काठावर सुसाईड नोटही सापडली

    follow whatsapp