स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, मालवणात एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्याकाही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. शासनाकडे वारंवार मागण्या करुनही पदरात यश येत नसल्यामुळे मालवणमधील एसटी कर्मचाऱ्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. मालवण तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार जी. एम. कोकरे यांना मुख्यमंत्री यांना देण्यात येणारे निवेदन मालवण एसटी कर्मचारी काका खोत, हेमंत […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:19 PM • 11 Jan 2022

follow google news

राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्याकाही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. शासनाकडे वारंवार मागण्या करुनही पदरात यश येत नसल्यामुळे मालवणमधील एसटी कर्मचाऱ्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.

हे वाचलं का?

मालवण तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार जी. एम. कोकरे यांना मुख्यमंत्री यांना देण्यात येणारे निवेदन मालवण एसटी कर्मचारी काका खोत, हेमंत तळवडकेकर, दीपक ढोलम व अन्य कर्मचारी यांच्या वतीने मंगळवारी देण्यात आले. या निवेदन पत्रावर मालवण आगारातील सुमारे दीडशे कर्मचारी यांच्या स्वाक्षरी आहेत.

महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदानिहाय वेतनश्रेणी देऊन आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्मचारी यांनी निवेदन पत्रातून केली आहे.

दरम्यान एसटी कामगार संपावर अजुनही अडून बसल्यामुळे, सिंधुदुर्गात एसटी प्रशासनाने विनाअपघात सेवा बजावलेल्या व प्रशासनाच्या निकषात बसणाऱ्या ३५ सेवानिवृत्त चालकांची यादी तयार करण्यात आली आहे. या चालकांमार्फत आता एसटी सेवा सुरु करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. ५८ ते ६२ वर्ष पूर्ण होण्यास सहा महिने कमी असणाऱ्यांनाच पुन्हा नोकरी मिळणार आहे. ही नेमणुक करताना प्रत्येक कर्मचाऱ्याची आरोग्य तपासणीही केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना एका महिन्यात २६ दिवस काम करणाऱ्यांना २० हजारांचं मानधन मिळणार आहे.

सिंधुदुर्ग विभागात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पुन्हा कामावर हजर होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर आपण कामावर हजर झालो तर संपकरी कर्मचाऱ्यांचा रोष आपल्याला सहन करावा लागेल. अशी भीती काही निवृत्त चालकांना वाटत आहे. तर सेवानिवृत्तांना हजर करून घेऊन एसटी वाहतूक रुळावर आणण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत .

    follow whatsapp