गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 दिवस आधीच भरला पवई तलाव

मुस्तफा शेख

• 02:53 PM • 12 Jun 2021

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज दिनांक 12 जून 2021 रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. हाच तलाव गेल्या वर्षी दिनांक 5 जुलै 2020 रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. ही बाब लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव […]

MumbaiTak
Google CTA

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज दिनांक 12 जून 2021 रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. हाच तलाव गेल्या वर्षी दिनांक 5 जुलै 2020 रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. ही बाब लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव सुमारे 24 दिवस आधी भरून वाहू लागला आहे.

हे वाचलं का?

545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Mumbai Rain : हिंदमाता परिसर पुन्हा जलमय

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे :

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.

या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले.

या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.

तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते.

हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चांगला पाऊस पडतो आहे. पुढचे दोन दिवसही चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत यावेळी पाऊस वेळेवर आला असून चांगला पाऊस पडत असल्याने आता पवई तलाव भरून वाहू लागला आहे.

या तलावातलं पाणी हे मुख्यत्वे करून इंडस्ट्रीसाठी वापरण्यात येतं. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा तलाव भरून वाहू लागला.