पुणे : लाखोंची फसवणूक, तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार; ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

मुंबई तक

• 11:46 AM • 29 Dec 2021

गुन्हेगारी घटनांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यात एक धक्कायदायक घटना उघडकीस आली आहे. मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झालेल्या एका व्यक्तीने तरुणीची आर्थिक फसवणूक करत तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडल्याचा आरोप असून, पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2018 मध्ये पीडित तरुणी आणि […]

Mumbaitak
follow google news

गुन्हेगारी घटनांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यात एक धक्कायदायक घटना उघडकीस आली आहे. मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झालेल्या एका व्यक्तीने तरुणीची आर्थिक फसवणूक करत तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडल्याचा आरोप असून, पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

2018 मध्ये पीडित तरुणी आणि आरोपी यांची एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झाली होती. लग्नाचे आमिष दाखवत आरोपी सचिन भाऊसाहेब गुंजाळ याने पेट्रोल पंपाचं लायसन्स काढण्यासाठी बजाज फायनान्समधून 5 लाख 30 हजार रुपयांचं लोन काढण्यास तरुणीला प्रोत्साहित केलं.

2018 मध्ये त्याचा भाऊ सागर गुंजाळने आयटीआर अडचणींचं कारण सांगून सांगून 5 लाख 95 हजारांची रोख रक्कम तरुणीकडून घेतली, असा आरोप पीडितेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केलेला आहे.

त्यानंतर सचिन गुंजाळने मित्र श्रीकांत राजे आणि अभिजीत पवार यांच्याशी संगनमत करुन पीडित तरुणी आणि तिच्या भावासमोर व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. भागीदारीमधील प्रक्रियेसाठी काही कोऱ्या कागदपत्रांवर पीडितेच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचं सांगून दोन बँकांमधून एकूण 15 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास पीडित तरुणीला प्रोत्साहित केलं. हॉटेल व्यवसायाच्या सप्लायर्स करता लागणारे पैसे, गाळ्याचे भाडे आणि डिपॉझिट तसेच खात्यावर काही रक्कम असे एकूण 6 लाख रुपये पीडितेकडून घेण्यात आले.

पैशाची विचारणा केल्यानंतर केला अनैसर्गिक अत्याचार

हे सर्व प्रकरण झाल्यानंतर 7 फेब्रुवारी 2021 रोजी पीडित तरुणी एकटीच घरी होती. त्यावेळी आरोपी गुंजाळ दारुच्या नशेत घरी आला. गुंजाळला पीडितेनं दिलेल्या पैशांबद्दल विचारणा केली. त्यावर संतापलेल्या गुंजाळने जबरदस्ती अनैसर्गिक अत्याचार केला. तसंच घडलेल्या प्रकाराबद्दल कुणाकडे वाच्यता केल्यास आपल्याला (पीडित तरुणी) आणि आपल्या भावाला जिवे मारू अशी धमकी दिली, आरोपी गुंजाळने दिली.

त्याचबरोबर शारीरिक संबंधांवेळी काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली, असंही पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपी आणि त्याचे दोन मित्र अशा तीन जणांविरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

    follow whatsapp