पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारच्या सुमाराला ही घटना घडली. पुण्यातल्या नवी पेठ भागात ३० वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
तरूणाची सुसाईड नोटही सापडली
माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये,नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. हा मजकूर लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली आहे. त्रिगुण कावळे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिगुण कावळे हा तरुण मुळचा जालन्यातला आहे. तो एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यातील नवी पेठेतील राही अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर मित्रांसोबत राहत होता. नेहमीप्रमाणे त्याचे मित्र सकाळीच मित्र रूममधून अभ्यासिकेवर गेले होते. दुपारी ते रूमवर आल्यावर रूम बंद होती.आतमधून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद मिळाला नाही. त्या घटनेची माहिती आम्हाला मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर त्रिगुण कावळे हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला.
त्रिगुणला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले. त्रिगुण कावळेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.ती रूम मध्ये आढळून आली. नैराश्यातून आत्महत्येचं पाऊल उचलत असून याला कोणालाही जबाबदार धरू नये,असे त्रिगुण कावळे याने त्यात म्हटले असल्याच विश्रामबाग पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
