सांगली : लॉकडाउन काळात क्रिकेट खेळणाऱ्या १० जणांवर कारवाई

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सांगलीत स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लोकांनी घरात राहून नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन सरकारी यंत्रणा करत आहेत. परंतू काही लोकं तरीही नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत. सांगलीत लॉकडाउनचे नियम मोडून क्रिकेट खेळणाऱ्या १० मुलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सांगलीच्या बाबासाहेब आंबेडकर मैदानावर काही मुलं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:25 AM • 11 May 2021

follow google news

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सांगलीत स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लोकांनी घरात राहून नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन सरकारी यंत्रणा करत आहेत. परंतू काही लोकं तरीही नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत. सांगलीत लॉकडाउनचे नियम मोडून क्रिकेट खेळणाऱ्या १० मुलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

हे वाचलं का?

सांगलीच्या बाबासाहेब आंबेडकर मैदानावर काही मुलं क्रिकेट खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस पोहचले असता काही मुलं तिकडे खरंच क्रिकेट खेळत आणि व्यायाम करत असल्याचं पोलिसांना पहायला मिळालं. पोलीस आल्याचं पाहताच मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. ४ जण पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरीही १० मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. या सर्वांविरोधात लॉकडाउनचे नियम मोडल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सांगली : कोविड चाचणी न करताच घरावर लावला फलक, महापालिकेचा अजब कारभार

    follow whatsapp