शिवसैनिकांना स्वबळाच्या तयारीचे आदेश, अजित पवारांना सूचक इशारा; संजय राऊत म्हणतात…

मुंबई तक

• 12:19 PM • 26 Sep 2021

राज्यात लवकरच महत्त्वाच्या महापालिका निवडणुका होणार असून, पिंपरी-चिंचवडमध्येही निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी पु्ण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही लक्ष्य केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आघाडीबद्दलची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले,’ ‘संजय राऊत म्हणाले,’ पालकमंत्री आपले नाहीत. महाराष्ट्रात […]

Mumbaitak
follow google news

राज्यात लवकरच महत्त्वाच्या महापालिका निवडणुका होणार असून, पिंपरी-चिंचवडमध्येही निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी पु्ण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही लक्ष्य केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आघाडीबद्दलची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

हे वाचलं का?

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले,’ ‘संजय राऊत म्हणाले,’ पालकमंत्री आपले नाहीत. महाराष्ट्रात आपली सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाहीत, असं म्हणतात. असं कसं काय होईल. असं होता कामा नये. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजितदादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू. दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर आज दिल्ली गेले आहेत.’

‘माझं पूर्ण ऐका. चुकीचं लिहू नका. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर सुद्धा राज्य करायचं आहे. आपल्या हळूहळू दिल्लीत पोहोचायचं आहे. त्यामुळे साऊथ ब्लॉक. पंतप्रधान कुठे बसतात. गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे. या सगळ्यांचा अंदाज घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज दिल्लीत गेले आहेत’, असं राऊत म्हणाले.

‘आपण अजितदादांसोबत बसू आणि सांगू की आपल्याला एकत्र काम करायचं आहे. त्यामुळे आमच्या लोकांचं ऐकून घ्यावं. आमच्या लोकांना नाराज करू नका. नाहीतर गडबड होईल’, असा सूचक इशाराही राऊतांनी यावेळी दिला.

याच कार्यक्रमात राऊतांनी शिवसैनिकांना एकट्याने लढ्याची तयारी ठेवा. कारण आपल्याला एकट्याने लढण्याची सवय आहे’, असं सांगत तयारीला लागण्याच्या सूचनाही केल्या.

‘आता पुढे काय होईल. आपली आघाडी होईल का? नाही झाली तर… त्या भानगडीत कशाला पडायचं आपण. आपल्याला एकट्याने लढण्याची जास्त सवय आहे. आपण सगळ्या जागांवर लढण्याचा प्रयत्न करू. आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय. उद्या आपल्यासोबत चर्चेला बसतील. मग या घ्या. एवढ्या घ्या. ठिके. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार नाही, हे लक्षात घ्या’, असं शिवसैनिकांना सांगतानाच राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला.

    follow whatsapp