Shikhar Dhawan Divorce : शिखर-आयेशा घटस्फोट; पत्नीची भावनिक पोस्ट

मुंबई तक

• 01:21 AM • 08 Sep 2021

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा संसार मोडला. शिखर आणि आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे. शिखरची पत्नी आयेशाने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून याबद्दलची माहिती दिली. ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांनी लग्न केलं होतं. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. तर शिखर आणि आयेशाला एक […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा संसार मोडला. शिखर आणि आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे.

शिखरची पत्नी आयेशाने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून याबद्दलची माहिती दिली.

ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांनी लग्न केलं होतं. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं.

आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. तर शिखर आणि आयेशाला एक मुलगा झाला. शिखर-आयेशाच्या मुलाचं नाव जोरावर असून, तो ७ वर्षांचा आहे.

आयेशा मुखर्जी मेलबर्नमध्ये राहते. २०२० मध्येच दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती.

आयेशा मुखर्जीने म्हटलंय की, ‘एकदा घटस्फोट झालेला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा बरंच काही पणाला लागलेलं होतं. मला बरंच काही सिद्ध करायचं होतं. त्यामुळेच दुसरा घटस्फोट माझ्यासाठी खूप भीतीदायक होता.’

‘माझ्यासाठी घटस्फोट वाईट शब्द होता, तरीही माझा दोन वेळा घटस्फोट झाला.’

मजेशीर बाब म्हणजे शब्दाचे अर्थ आणि संबंध किती कठीण असू शकतात. हे मी घटस्फोटीत म्हणून अनुभवलं आहे’, असं आयेशा म्हणाली.

‘जेव्हा पहिल्यांदा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. मी अपयशी झाले आहे, असंच मला वाटलं होतं आणि त्यावेळी बरंच काही चुकीचं करत होते.’

‘मला असं वाटलं मी सगळ्यांना अपमानित केलं. स्वार्थी असल्यासारखं वाटलं. आपल्या आईवडिलांना नाराज केलंय असंही मला वाटून गेलं.’

‘माझ्या दोन मुलांनाही अपमानित केल्यासारखं मला वाटलं. इतकंच नाही, तर देवाचाही अपमान केल्यासारखं मला जाणवलं.’

‘घटस्फोट खूप वाईट शब्द आहे. विचार करा असं माझ्यासोबत दुसऱ्यांदा घडलं. हे भयंकर होतं’, असं आयेशानं म्हटलं आहे.

‘पहिल्या घटस्फोटानंतर माझं सर्वस्व पणाला लागलेलं होतं. त्यामुळे दुसऱ्यांदा संसार मोडणं माझ्यासाठी खूप वाईट होतं.’

‘पहिल्या घटस्फोटानंतर ज्या भावना आणि परिस्थितीतून मी गेले होते, ती पुन्हा परत आली आहे. शंभर पटीने भीती आहे. अपयश आणि निराशा. सगळ्याचा अर्थ काय?’, अशा भावना आयेशानं व्यक्त केल्या आहेत.

    follow whatsapp