संजय राऊत म्हणतात, “किमान वीर सावरकरांच्या वंशजांनी तरी या गोष्टी…”

वीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काय सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये प्रत्येकाचे एक वेगळे स्थान आहे. आमच्यासाठी वीर सावरकर हे वंदनीय आहेत आणि प्रिय आहेत. ज्या लोकांनी या देशासाठी आपल्या सुखाचा त्याग केला, या सगळ्या लोकांसाठी देशामध्ये आदर आणि निष्ठा आहे आणि पुढेही राहणार, हे स्वातंत्र्य सेनानी कुठल्याही […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:19 AM • 19 Nov 2022

follow google news

वीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काय सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये प्रत्येकाचे एक वेगळे स्थान आहे. आमच्यासाठी वीर सावरकर हे वंदनीय आहेत आणि प्रिय आहेत. ज्या लोकांनी या देशासाठी आपल्या सुखाचा त्याग केला, या सगळ्या लोकांसाठी देशामध्ये आदर आणि निष्ठा आहे आणि पुढेही राहणार, हे स्वातंत्र्य सेनानी कुठल्याही पार्टीचे नाही, परंतु एक विचारधाराचे आहे, हे सगळ्यांना माहित असले पाहिजे, आता हे स्वातंत्र्य सेनानी जीवित नाही, परंतु कोणीही या महान पुरुषांविरोधात अशी टिपण्णी करायला नको असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

स्वातंत्र्यलढ्यात वीर सावरकर, पंडित नेहरू, मौलाना आझाद सगळ्यांचं योगदान

पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, लालबहादूर शास्त्री या सगळ्यांचे योगदान आहे. कोणी वीर सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून पंडित नेहरूवर प्रश्न निर्माण करायचे, हे निदान स्वतःला सावरकरांचे वंशज समजणाऱ्या लोकांनी तरी थांबवले पाहिजे. ही आपली परंपरा नाही आणि आम्ही सर्व सावरकरांसाठी लढाई करत आहोत. पण या देशाचे स्वातंत्र्य घडवण्यास आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यास, हा देश विकासाच्या वाट्यात पुढे नेण्यात, पंडित नेहरू यांचे मोठे योगदान आहे हे विसरता कामा नये असंही संजय राऊत म्हणाले.

आपण म्हणतो की जर सावरकर विज्ञान निष्ठ होते, तर त्या विज्ञान निष्ठेच्या दिशेने देशाला नेण्याचे काम हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले आहे. नाहीतर या हिंदुस्तानच पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे नेहरूंनी ते होऊ दिले नाही, म्हणून हा देश नेहरूंचा ऋणी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आमच्यासाठी वीर सावरकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, नेहरू ज्यांनी स्वातंत्र्यचळवळीत आपल्या सुखाचा त्याग केलाय. सगळ्यांच्या मनात या नेत्यांबद्दल आदर आहे. देश निर्मितीसाठी या लोकांनी त्याग केलाय. ते लोक जिवंत नाहीत, त्यांच्याविरोधात कुणीही चिखलफेक करू नये, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

रणजित सावरकरांना उद्देशून संजय राऊत म्हणाले, ‘ कुणी सावरकरांबद्दल प्रश्न निर्माण केले म्हणून त्यांनी नेहरूंबाबत प्रश्न निर्माण करायचे… स्वतःला सावरकरांचे वंशज म्हणवणाऱ्यांनी हे थांबवायला पाहिजे. ही आपली परंपरा नाही.

    follow whatsapp