संतापजनक घटना! बीडमध्ये सख्ख्या आणि चुलत भावाचा अल्पवयीन बहिणीवर शारीरिक अत्याचार

बीडच्या अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून सख्ख्या आणि चुलत भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर शाररिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. पीडित मुलगी सहा महिन्याची गर्भवती राहिल्यामुळे हा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:40 AM • 01 Dec 2021

follow google news

बीडच्या अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून सख्ख्या आणि चुलत भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर शाररिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. पीडित मुलगी सहा महिन्याची गर्भवती राहिल्यामुळे हा प्रकार समोर आला.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी भाऊ बऱ्याच दिवसांपासून बहिणीचं शोषण करत होते. दरम्यान पीडित मुलीचे पोट दुखायला लागल्यानंतर घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केली असता ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं.

बुलढाणा : काकाकडून अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी रात्री उशीरा, पीडित मुलीच्या सख्ख्या आणि चुलत भावासह आणखी एका व्यक्तीवर कलम 376 ( 2 ) ( I ) ( N ) ( F ), 354 ( अ ) 34 भादवि सह ( N ) 3 , 8 , 12 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. तर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर दोन आरोपींचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे बीड जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याची चिंताजनक चित्र निर्माण झालं आहे.

Crime: धक्कादायक… 12 वर्षीय मुलाचा 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

    follow whatsapp