हवाला मार्गे लाखो रुपये घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हवालामार्गे लाखो रुपये घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विदर्भ एक्स्प्रेसच्या एससी कोचमधून या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.
ADVERTISEMENT
अकोला आरपीएफ रेल्वे सुरक्षा दलाला खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. अकोल्यावरून मुंबईला हवाल्याची काही रक्कम विदर्भ एक्सप्रेसच्या एसी कोचमधून एक व्यक्ती घेऊन चालला आहे, असल्याचं खबऱ्यानं सांगितलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची तपासणी केली. बॅग बघितल्यानंतर खबऱ्यानं दिलेल्या माहितीवर शिक्कामोर्तब झालं. आरोपीच्या बॅगेत १००, २००, ५००, २००० रुपयांच्या नोटांची बंडल बाहेर पडली. त्यानंतर पोलिसांनी रक्कम मोजली असता बॅगेत ४३ लाख रुपये आढळून आले.
ही रक्कम कुणाची आहे, याविषयी कोणतीही कागदपत्रं या व्यक्तीजवळ नसल्यानं ही रक्कम हवालाची असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी ही सर्व रक्कम जप्त करून आरोपी मनोज हरिलाल शर्मा या व्यक्तीला रकमेसह रेल्वे पोलीस दलाच्या स्वाधीन केलं. पुढील कारवाई GRP पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT











