Maharashtra SSC Result 2021 : क्या बात है! 957 विद्यार्थी आणि 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के

मुंबई तक

• 08:28 AM • 16 Jul 2021

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद झाली. आज दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. एवढंच नाही तर 957 विद्यार्थी आणि 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर दहावी परीक्षेत […]

Mumbaitak
follow google news

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद झाली. आज दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. एवढंच नाही तर 957 विद्यार्थी आणि 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

हे वाचलं का?

यंदाच्या निकालात दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर दहावी परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. संपूर्ण राज्यात मिळून 758 मुले नापास झाली पुन्हा परीक्षा देणारे 128 विद्यार्थी नापास झाले आहेत. राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे तर 9 शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाची घोषणा केली. यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

अशी असेल मूल्यमापनाची पद्धत जाहीर:

अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळा, शिक्षक मुख्याध्यापक यांच्यावरील जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेत 7 सदस्याची निकाल समिती स्थापित केली जाणार आहे. ही समिती मंडळाच्या कार्यवाहीच्या वेळापत्रकानुसार कामकाजाची रुररेषा ठरवतील.तसेच यावेळी मुख्याध्यापकांवर महत्त्वाची जबाबादारी असणार आहे. शाळा समितीकडून तयार केलेला निकाल संगणक प्रणालीमध्ये नोंदवण्याची आणि निकाल मंडळाला गोपनीय पद्धतीने देण्याती जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना गुण कसे दिले जाणार?

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केला जाणार असला तरीही त्यासाठी शिक्षण खात्याने आता एक विशिष्ट प्रारुप ठरवून दिलं आहे. जाणून घ्या कशापद्धतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे.

2020-21 साठी इ. 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषाद्वारे निश्चित करण्यात येईल.

1. विद्यार्थ्यांचे इ. 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण

2. विद्यार्थ्यांचे इ. 10चे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण

    follow whatsapp