बीडमध्ये काल पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. परळीतील मिरवड फाट्यावर एका सरपंचाला राखेची वाहतूक करणाऱ्या हायवाने उडवल्यानंतर त्यांच्या मृत्यू झाला. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांची मालिका सुरूच असून, या घटनेनंतर पुन्हा एकदा घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. तसंच राखेच्या अवैध वाहतुकीचा मुद्दाही सध्या गंभीर होत चालल्याचं दिसतंय. यावरुनच सुऱेश धस यांनीही सडकून टीका केली असून, यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सुरेश धस काय म्हणाले?
हे ही वाचा >> Laxman Hake on BJP : "आम्ही BJPला निवडून देण्याचं आवाहन केलं, पण आता गिल्टी फील होतंय"
"रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी घटना घडली. बोगस आणि अवैध राखेची जी लूट सुरू आहे, त्या टीप्परकडून सौंदाना गावच्या दलित समाजाच्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय. घातपात आहे की अपघात याचा तपास व्हायचा आहे पण,
राज्यात एवढी भयानक चर्चा सुरू असूनही, यांचे राखेचे टीप्पर बंद नाही, राखेचे टीप्पर सुरूच आहेत. याला परळीचे पोलीस आणि थर्मला पावरचे अधिकारी जबाबदार आहेत. सरकारने पावलं उचलावी. गुंडगिरी वाळू माफिया, राख माफिया, स्क्रॅप, गुटखा माफियांवर मोका अंतर्गत कारवाई हेच या प्रश्नाचं उत्तर आहे असं सुरेश धस म्हणाले आहेत." असं सुरेश धस म्हणाले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर हायवा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या घटनेत अनेकांकडून संशय व्यक्त केला जात असला तरी, तशी खात्रीलायक माहिती अजून समोर आलेली नाही.
हे ही वाचा >> Mumbai Best Bus Accident : मुंबईत पुन्हा BEST बसचा अपघात, चहाच्या टपरीला धडकल्यानं टळला मोठा अपघात
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील पवनचक्की आणि औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा आणि त्यातून निर्माण झालेल्या माफीयांचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच त्याच राखेची वाहतूक करणाऱ्या या हायवाने सरपंचाला उडवल्यानं शंका व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
