Mumbai Best Bus Accident : मुंबईत पुन्हा BEST बसचा अपघात, चहाच्या टपरीला धडकल्यानं टळला मोठा अपघात
हा पूर्णपणे निष्काळजीपणाचा प्रकार असून, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील असं पोलीस म्हणाले. तसंच या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये संताप दिसून आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत बेस्ट बसचा अपघात

हँड न लावल्यानं बस थेट टपरीला धडकली

टपरीला बस धडकल्यानं पुढचा अपघात टळला
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला परिसरात घडलेल्या बेस्ट बस अपघाताच्या खुणा ताज्या असतानाच आता पुन्हा एक मोठा अपघात होता होता टळला आहे. मुंबईतील कन्नमवार नगरमध्ये शनिवारी एका चहाच्या टपरीला एक बेस्ट बस येऊन धडकली. बसची धडकेत आजूबाजूला उभे असलेल्या अनेक लोक अगदी थोडक्यात बचावले. या अपघातात एक जण जखमी झाला. विशेष म्हणजे ही हा अपघात झाला तेव्हा, बसच्या चालकाच्या सीटवर चालकच बसलेला नव्हता.
बस चालकाने हँडब्रेक न लावता बस स्टॉपजवळ उभी केल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. चालक हँडब्रेक लावायला विसरला होता, त्यामुळे हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस चालक त्याचं ड्युटीचं वेळापत्रक पाहण्यासाठी स्टँडमध्ये आत गेला होता. या दरम्यान, हँडब्रेक न लावल्यामुळे, बस पुढे सरकली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीला जाऊन धडकली. ही बस अंधेरीच्या आगरकर चौकातून आलेली होती.
हे ही वाचा >> Ravindra Chavan: ठरलं... फडणवीसांचे निकटवर्तीय भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, रवींद्र चव्हाणांवर मोठी जबाबदारी
दरम्यान, या अपघातात 20 वर्षीय चंद्रदा राणा जखमी झाल्या आहे. मात्र, त्यांनी या घटनेबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. अपघातात चहाच्या टपरीचं नुकसान झालं आणि बसची पुढची काचही फुटली. घटनेच्या वेळी दुकानात उपस्थित असलेलं कोणीही जखमी झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा >> महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? शरद पवार आणि CM फडणवीस यांच्यात फोनवर झाली चर्चा, नेमकं काय घडलंय?
घटनेनंतर बस चालकाला समज देऊन सोडून देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा पूर्णपणे निष्काळजीपणाचा प्रकार असून, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये संताप दिसून आला. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात झाला असता असं म्हणत लोकांनी संताप व्यक्त केला.