प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ संशयित कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत एवढंच नाही तर बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी हजर झाली आहे असंही समजतं आहे. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आहेत तसंच स्फोटकंही आहेत. ही कार इथे कुणी ठेवली ? याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
पाहा याच संदर्भातला विशेष व्हीडिओ
मुकेश अंबानी यांचं अँटेलिया हे निवासस्थान हे मुंबईतील पेडर रोड या ठिकाणी आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. पेडर रोड भागात मर्सिडिज, ऑडी, रॅण्ड रोव्हर यांसारख्या कार असतात. मात्र या भागात स्कॉर्पियो कार दिसल्याने पोलिसांनी संशय आला. ही कार लगेच तपासण्यात आली. ज्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम लगेच घटनास्थळी दाखल झाली.
जिलेटिन स्टिक्स असलेली ही कार या ठिकाणी कुणी ठेवली? त्यामागचा उद्देश काय? मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ही कार का लावण्यात आली? या आणि अशा सगळ्या प्रश्नांचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जातो आहे. जिलेटिन स्टिक्स असलेली कार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडणं हे धोक्याचं मानलं जातं आहे. घटनास्थळी पुढील तपास सुरू आहे. बॉम्ब शोधक पथकही या ठिकाणी दाखल झाली आहे.
मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कार सापडली आहे. या स्कॉर्पिओ कार आणि त्यात आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्यांबाबतची चौकशी मुंबई क्राईम ब्रांच करते आहे. लवकरच यातलं सत्य बाहेर येईल असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
