Tamil Nadu होऊ दे खर्च! : PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त सोन्याच्या अंगठ्या आणि मासेवाटप कार्यक्रम

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी (१७ सप्टेंबर) रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसानिमित्त तामिळनाडू भाजपनेही खास आणि आगळीवेगळी अशी योजना आणली आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना तमिळनाडू भाजपकडून सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. सोबतच ७२० किलो मासेही वाटले जाणार आहेत. याबाबत बोलताना माहिती आणि […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:32 AM • 16 Sep 2022

follow google news

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी (१७ सप्टेंबर) रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसानिमित्त तामिळनाडू भाजपनेही खास आणि आगळीवेगळी अशी योजना आणली आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना तमिळनाडू भाजपकडून सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. सोबतच ७२० किलो मासेही वाटले जाणार आहेत.

हे वाचलं का?

याबाबत बोलताना माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन म्हणाले की, अंगठी वाटप योजनेसाठी आम्ही चेन्नईतील RSRM सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. याठिकाणी उद्या जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. अंगठीसाठी येणाऱ्या खर्चाबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक अंगठी २ ग्रॅमची असेल, ज्याची किंमत ५ हजार रुपयांपर्यंत आहे. ही मोफत देण्यात येणारी वस्तू नाही. पण या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या मुलांचे स्वागत करत आहोत. १७ सप्टेंबरला रुग्णालयात १० ते १५ मुलांचा जन्म होण्याची शक्यता आहे.

मासेवाटप योजनेला पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असे नाव देण्यात आले असून ७२० किलो मासे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड केली आहे. मासे उत्पादनाला प्रोत्साहन देणं हा या योजनेचा उद्देश आहे. आम्ही यासाठीच ही पावले उचलत आहे. मोदी यावेळी ७२ वर्षांचे होत आहेत आणि यामुळेच आम्ही ७२० आकडा निवडला आहे, असेही मंत्री एल मुरुगन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मोदींचा वाढदिवस ते गांधी जयंतीपर्यंत राज्यात ‘सेवा पंधरवडा’

दरम्यान महाराष्ट्रतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अशा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत राज्य सरकारकडून सेवा पंधरवडा या नव्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांची कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी राज्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दिल्ली भाजपनेही १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. या कालावधीत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

    follow whatsapp