मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
एका सापाने भिवंडी ते कल्याण असा बसने प्रवास केल्याने प्रवासी आणि बस चालक सगळेच भयभीत झाले होते. शहापूर बस डेपोतील राज्य परिवहन मंडळाची एक बस घेऊन चालक राहुल कलाने हे भिवंडीहून कल्याणला निघाले. बसमधे प्रवासीही मोठ्या प्रमाणावर होते. भिवंडीपासून कल्याणच्या अर्ध्या मार्गात आल्यानंतर बसमध्ये चालक आणि प्रवाशांना एक साप दिसला. सापाला पाहून चालक, वाहक आणि प्रवासी सगळ्यांचीच भंबेरी उडाली.
ST च्या अधिकाऱ्यांनी सर्प मित्र दत्ता बोंबे यांना फोन केला. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी घाबरू नका बस कल्याण डेपोमध्ये घेऊन या असं सांगितलं. त्यानंतर या सापासह बस कल्याण डेपोमध्ये पोहचली. कल्याण डेपोच्या कार्यशाळेतील मॅकेनिकही बसमध्ये चढले त्यांनी पत्रा कापला असता त्याखाली त्यांना साप दिसला. हा तस्कर जातीचा साप आहे असं सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितलं. हा साप विषारी नाही, मात्र या सापाने प्रवाशांसोबत भिवंडी ते कल्याण असा प्रवास केल्याने सगळ्यांचीची भीतीने गाळण उडाली होती. कल्याणला बस आली तेव्हा दत्ता यांनी या सापाला पकडलं. त्यानंतर जंगलात सोडून दिलं.
ADVERTISEMENT
