टूल किट प्रकरण: शंतनू मुळूकला मोठा दिलासा, ट्रान्झिस्ट जामीन मंजूर

मुंबई तक

• 01:35 PM • 16 Feb 2021

औरंगाबाद: ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील शंतनू शिवलाल मुळूक (बीड) याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी शंतनू मुळूक याच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतेज जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिस्ट अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. […]

Mumbai Tak
Google CTA

औरंगाबाद: ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील शंतनू शिवलाल मुळूक (बीड) याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी शंतनू मुळूक याच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतेज जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिस्ट अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. जो कोर्टाने मंजूर केला आहे. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ईमेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे.

हे वाचलं का?

या ट्रान्झिस्ट जामिनामुळे शंतनूला आता 10 दिवसांचा वेळ आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे शंतनूला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दिशा रवीवर शेतकर्‍यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आले होते.

ही देखील बातमी वाचा: टूल किट प्रकरण : शंतनू मुळूकच्या राहत्या घरी दिल्ली पोलिसांचा छापा

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दिशा रवीवर शेतकर्‍यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केलं होतं. याच दरम्यान बीडमधील शांतनू मुळूक याचं नाव समोर आलं होतं. त्यामुळे शांतनूवर 153A, 120B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दिल्ली पोलिसांची एक टीम याप्रकरणी तपासासाठी थेट बीडमध्ये शंतनूच्या घरी पोहचली. पण यावेळी शंतनू घरी नव्हता. दरम्यान, शंतनूच्या घरच्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती.

याच याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा कोर्टाने शांतनू हिला 10 दिवसासाठी ट्रन्झिस्ट जामीन मंजूर केली आहे. 10 दिवसांमध्ये शांतनूला दिल्ली कोर्टात आपली बाजू मांडता येणार आहे.