राकेश झुनझुनवालांचं इतिहास प्रेम; भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची विशेष श्रद्धांजली

मुंबई तक

• 03:38 PM • 14 Aug 2022

मुंबई: प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झालं. दलाल स्ट्रीटचे बिग बुल म्हणून झुनझुनवाला यांची ओळख होती. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गौतम अदानींपर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी झुनझुनवाला यांना श्रंद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झालं. दलाल स्ट्रीटचे बिग बुल म्हणून झुनझुनवाला यांची ओळख होती. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गौतम अदानींपर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी झुनझुनवाला यांना श्रंद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थने देखील राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे वाचलं का?

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने काय ट्विट केले आहे?

”श्री राकेश झुनझुनवाला यांची खूप आठवण येईल. एक द्रष्टा गुंतवणूकदार, एक हुशार नेता, त्यांना भारतीय इतिहास आणि वारसा याबद्दल खूप रस होता. ते बोरीचे मोठे समर्थक होते. त्यांनी आमच्या डिजिटल उपक्रमांमध्ये खूप योगदान दिले होते. आमचे विचार आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.” असे ट्विट भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थने केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी वाहिली श्रद्धांजली

राकेश झुनझुनवाला न नमणारे व्यक्तिमत्व होते. त्यांचे संपूर्ण जीवन विनोदी आणि अंतर्दृष्टी असलेले होते, त्यांनी आर्थिक जगामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्सुक होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या प्रति माझ्या संवेदना. ओम शांती. अशा आशयाचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले गौतम अदानी

“भारतातील सर्वात दिग्गज गुंतवणूकदाराच्या अकाली निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. श्री झुनझुनवाला यांनी आपल्या उत्कृष्ट विचारांनी एका संपूर्ण पिढीला आपल्या इक्विटी मार्केटवर विश्वास ठेवण्यास प्रेरित केले. आम्ही त्यांनी मिस करू. भारताला त्यांची उणीव भासेल पण आपण त्यांना कधीच विसरणार नाही. RIP,” असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पियूष गोयल काय म्हणाले?

“दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने खूप दुःख झाले. करोडोच्या संपत्ती निर्मितीसाठी ते प्रेरणास्थान होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि प्रशंसक यांच्याबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती.” असे ट्विट केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची श्रद्धांजली

“श्री राकेश झुनझुनवाला आपल्यात राहिले नाहीत. गुंतवणूकदार, धाडसी जोखीम घेणारा, शेअर बाजाराची निपुण समज, संवादात स्पष्ट, ते स्वत: एक नेते होते. आमच्यात झालेली अनेक संभाषणे मनापासून लक्षात राहतील. भारताच्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवर त्यांचा दृढ विश्वास होता. शोकसंवेदना”. अशा आशयाचं ट्विट निर्मला सितारामन यांनी केलं आहे.

    follow whatsapp