नारायण राणेंच्या विरोधात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेही आले एकत्र

मुंबई तक

• 10:50 AM • 22 Nov 2022

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे एकत्र आले असं म्हटल्यावर तुम्हाला थोडं अजब वाटेल, पण झालंय तसंच! शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले, शिवसेनेत एकनाथ शिंदेंचा गटदेखील तसाच बाजूला झाला असं असतानाही आता नारायण राणेंना घेरण्यासाठी दोन ठाकरे आणि […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे एकत्र आले असं म्हटल्यावर तुम्हाला थोडं अजब वाटेल, पण झालंय तसंच!

हे वाचलं का?

शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले, शिवसेनेत एकनाथ शिंदेंचा गटदेखील तसाच बाजूला झाला असं असतानाही आता नारायण राणेंना घेरण्यासाठी दोन ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आलेत, आता ते का आणि कसं ते जाणून घेऊ.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बाळासाहेबांची शिवसेना, हे आजच्या काळात तरी एकत्र येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, कारण त्यांच्यामधले वाद इतके टोकाला पोहचले आहेत की काही सांगायला नको. अशातच सगळ्यात जुनी केस मुंबई सत्र न्यायालयासमोर घोषित केले जाते आणि या तिन्ही पक्षांना एकत्र यावं लागतं.

वर्ष 2005. तेव्हा शिवसेना सोडून बाहेर पडलेल्या नारायण राणेंची सामना कार्यालयाजवळ सभा सुरु होती. ही सभा सुरु असतानाच शिवसेनेकडून निदर्शने झाली होती. निदर्शन आणि त्यानंतर हिंसा या प्रकरणात 24 जुलै 2005 मध्ये एकूण 48 नेत्यांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याच खटल्याची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे.

याच प्रकरणाची सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब, श्रद्धा जाधव, राजू पेडणेकर, जितेंद्र जानवले तर मनसेचे बाळा नांदगावकर आणि इतर नेत्यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. यामध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनाही न्यायालयात हजर राहायचं होतं, मात्र ते आले नाहीत.

48 आरोपींपैकी 10 आरोपींचं निधन झालं आहे, राहिलेल्या 38 आरोपींपैकी फक्त 21 आरोपीच न्यायालयात हजर होते तर 17 जण गैरहजर होते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता 16 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

या सगळ्यावर बोलताना अनिल परब म्हणाले, वर्ष 2005 मध्ये आम्हाला माहिती मिळाली होती की सामना कार्यालयवर काही लोक हल्ला करणार आहेत. सामनाचा रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून त्यावेळी आम्ही संरक्षणासाठी सामना कार्यालयासमोर उपस्थित उपस्थित होतो. त्या प्रकरणात आमच्यावर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दाखल झालेला गुन्हा तो एकच प्रकरणात होता. म्हणून सर्वजण आरोपी आहेत. त्यामुळे सर्वजण कोर्टात आरोपी म्हणून हजर होते, त्यात नवीन काही नाही

    follow whatsapp