त्यांना माझा नमस्कार आहे ! उद्धव ठाकरे राजना असं का म्हणाले??

मुंबई तक

• 04:08 PM • 28 Feb 2021

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन जनतेची संवाद साधला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यापासून मराठा आरक्षणापर्यंत ते संजय राठोडांच्या राजीनाम्यावर विरोधकांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का?? असा प्रश्न विचारला असतान उद्धव ठाकरेंनी आमची इच्छा तर नाही, पण लोकांनी नियमांचं पालन […]

Mumbaitak
follow google news

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन जनतेची संवाद साधला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यापासून मराठा आरक्षणापर्यंत ते संजय राठोडांच्या राजीनाम्यावर विरोधकांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का?? असा प्रश्न विचारला असतान उद्धव ठाकरेंनी आमची इच्छा तर नाही, पण लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर मजबुरी आहे अशा आशयाचं उत्तर दिलं.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – या ४ कारणांमुळे शिवसेनेला घ्यावा लागला संजय राठोडांचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांचे भाऊ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमीत्त एका कार्यक्रमात कोरोनाविषयक धोरणांवर सरकारवर टीका करत मी मास्क घालणार नाही असं सांगितलं होतं. याविषयी प्रश्न विचारला असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना माझा नमस्कार आहे असं म्हणत मोजक्या शब्दांत राज ठाकरेंवर टीका केली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुजा चव्हाणचे आई-वडिल आपल्याला भेटून गेल्याचं सांगितलं. यावेळी चव्हाण कुटुंबियांनी पत्र लिहून आपल्या मुलीच्या होणारी बदनामी थांबवावी अशी विनंती केल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी लिहीलेलं पत्र वाचून दाखवलं. आम्हाला पोलीसांच्या तपासावर विश्वास आहे. याप्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता कमा नये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.

    follow whatsapp