नीरव मोदीच्या प्रत्यापर्णाला UK च्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी दिली आहे. त्यामुळे PNB घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदीला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच नीरव मोदीला ब्रिटनहून भारतात आणलं जाईल. ब्रिटन सरकारने भारताची नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणी मान्य केली आहे.
ADVERTISEMENT
नीरव मोदी सध्या लंडन येथील तुरुंगात आहे. 11 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नीरव मोदीवर आहे. नीरव मोदीने PNB च्या मुंबईतील शाखेच्या अधिकाऱ्यांसह मिळून हा घोटाळा केला. खोटी कागदपत्रं सादर करून त्याने हा घोटाळा केला. या प्रकरणी आता ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. भारतासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
ADVERTISEMENT
